Authentic चायनिज रेस्तराँमध्ये `टाईमपास` मागणारा अभिनेता क्षणात रस्त्यावर; आणि पुढे...
Chinese हॉटेलमध्ये गेल्यावर तुम्हीही टाईमपास मागता का? जरा जपून तुमच्यासोबत असं काहीतरी झालं नाही म्हणजे मिळवलं...
Viral Reel : तुम्ही कधी रस्त्यालगत असणाऱ्या फुटपाथवर असणाऱ्या चायनिजच्या स्टॉलवरून काही पदार्थ खाल्ले आहेत का? एकदातरी खाल्ले असतीलच. हो, पण जर तुम्ही अगदीच स्वच्छता आणि क्लास वगैरे पाळत असाल तर मात्र याला अपवाद ठरु शकता. तर.... सध्या अचानकच थेट भाषेत म्हणावं तर ठेल्यावरल्या चायनिजचा विषय निघण्यामागेही एक कारण आहे.
हे कारण म्हणजे व्हायरल होणारा एक व्हिडीओ. जिथं एक लोकप्रिय सेलिब्रिटी, सोशल मीडिया स्टार, एक अभिनेता Authentic Chinese Restraunt मध्ये गेला खरा. पण, तिथं त्यानं जो काय गोंधळ घातला, ते पाहून सोबत असणाऱ्या मित्रानंही डोकं धरलं. (Just Neel Things shared a video from chinese restraunt which all can relate)
हा सोशल मीडिया स्टार आहे, नील सालेकर. Just Neel Things म्हणून तुम्ही त्याला ओळखतच असाल. कोरोना काळापासूनच प्रसिद्धीझोतात आलेल्या या नीलनं नुकतंच एक Reel शेअर केलं. या रीलमध्ये (Instagram reels) तो आणि त्याचा एक मित्र बड्या हॉटेलमध्ये जातात. तिथं, हा पठ्ठ्या नेहमीसारखाच वागताना दिसतो.
'मागव मागव... चिकन चिली (Chicken Chillie), चिकन 65 (Chicken 65) मागव...' असं उत्साहात म्हणताना दिसतो. त्याचा हा उत्साह पाहून समोर बसलेला मित्र कसाबसा त्याला आवरतो. 'अरेssss इथे चिली वगैरे मिळत नसते.., इथे Dumpling, किमची वगैरे मिळतं' असं सांगताना दिसतो.
नील काहीतरी गडबड करणार असं वाटत असताना तेच होतं... तो त्या महागड्या हॉटेलमध्ये मागचापुढचा विचार न करता स्टॉलवर मागतात तले तळलेले नूडल्स (Fried Noodles) आणि शेजवान चटणी मागतो. बस्स, मग काय त्या हॉटेलमधून नील थेट रस्त्यावरच्या चायनिज स्टॉलजवळ पोहोचतो आणि पुढ्यात पाहतो तर कार, Time Pass , म्हणजेच नूडल्स आणि चटणीची प्लेट त्याच्यासमोरच असते.
थोडक्यात एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपली पहिलीच वेळ असते तेव्हा अनेकदा असे किस्से घडतात. त्यातही तुमच्या ग्रुपमध्ये असाच एखादा उत्साही मित्र असला, तर गोंधळ झालाच म्हणून समजा...
वाचा : 'अनन्या आणि कार्तिक एकत्र...', Ananya च्या आईचा मोठा खुलासा
नीलनं अतिशय विनोदी अंदाजात मांडलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. तुमच्या Friend Circle मध्ये आहे का असा एखादा Timepass मागणारा मित्र?