अनंत -राधिकाच्या संगीत सोहळ्यासाठी Justin Bieber ला सर्वाधिक मानधन; रिहाना, कॅटी पेरी, बियॉन्से पडल्या मागे
Justin Bieber to Perform at Anant Radhika Sangeet : अनंत आणि राधिकाच्या संगीत कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी जस्टिन बिबरनं घेतलं इतक्या कोटींचं मानधन...
Justin Bieber to Perform at Anant Radhika Sangeet : बिझनेसमॅन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी हा 12 जुलै रोजी सप्तपदी घेणार आहे. अनंत आणि राधिकाचं लग्न म्हणजे एक शाही विवाह सोहळा असणार आहेत. त्यात सगळे कार्यक्रम होतील. या आधी अंबानी कुटुंबानं अनंत आणि राधिकासाठी दोन प्री-वेडिंग फंक्शन होस्ट केले होते. सुरुवातीला झालेलं प्री-वेडिंग गे जामनगरला झालं तर त्यानंतर दुसरं प्री-वेडिंग हे इटलीमध्ये झालं. दोन्ही प्री-वेडिंगमध्ये बॉलिवूड पासून हॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. तर आता अखेर अनंत आणि राधिकाच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. काल अंबानी कुटुंबानं 'मामेरू' या विधीनं छोटा मुलगा अनंतच्या लग्नाची सुरुवात केली. अनंत आणि राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंग फंक्शनमध्ये रिहाना ते शकीरानं परफॉर्म केलं. तर त्यानंतर दुसऱ्या प्री-वेडिंगमध्ये कॅटी पेरीनं परफॉर्म केलं. त्यानंतर आता संगीतमध्ये लोकप्रिय पॉप सिंगर जस्टिन बिबर परफॉर्म करणार आहे.
पॉप सिंगर जस्टिन बिबर हा गुरुवारी मुंबईत पोहोचला. अनंत-राधिकाच्या लग्नाच्या आधी असलेल्या संगीतच्या कार्यक्रमात परफॉर्म करण्यासाठी तो इथे आला आहे. हा कार्यक्रम आज 5 जुलै रोजी अॅन्टिलियामध्ये होणार आहे. जस्टिननं गुरुवारी लॅन्ड केलं. सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. जस्टिन बिबर हा जवळपास 7 वर्षांनंतर भारतात येतोय. त्याआधी 2022 मध्ये तो कॉन्सर्ट करणार होता पण त्याच्या हेल्थ प्रॉब्लममुळे हा कॉन्सर्ट कॅन्सल झाला.
हेही वाचा : Team India : '...आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला'; प्रसाद खांडेकरची पोस्ट चर्चेत
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या संगीत कार्यक्रमात फक्त जस्टिन बिबर नाही तर अनेक इंटरनॅशनल सेलिब्रिटी परफॉर्म करणार आहेत. या शाही संगीत सोहळ्यात अडेल, ड्रेक आणि लाना डेल रेल सारखे सेलिब्रिटी परफॉर्म करण्याची चर्चा आहे. अनंत आणि राधिकाचं लग्न हे 12 जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर 13 जुलै रोजी आशीर्वाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आणि 14 जुलै रोजी कपलचं एक ग्रॅंड वेडिंग रिसेप्शन असेल.