Team India : '...आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला'; प्रसाद खांडेकरची पोस्ट चर्चेत

Prasad Khandekar Post For Team India : प्रसाद खांडेकरनं टीम इंडियासाठी लिहिलेली पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत...

दिक्षा पाटील | Updated: Jul 5, 2024, 11:49 AM IST
Team India : '...आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला'; प्रसाद खांडेकरची पोस्ट चर्चेत title=
(Photo Credit : Social Media)

Prasad Khandekar Post For Team India : आपल्या सगळ्या क्रिकेट चाहत्यांचं जे स्वप्न होतं ते अखेर टीम इंडियानं पूर्ण केलं. तब्बल 17 वर्षांनंतर टीम इंडियानं टी20 वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर त्यांचा आनंद हा चाहत्यांसोबत शेअर करण्यासाठी बीसीसीआयनं त्यांच्यासाठी मुंबईत एक परेड होईल अशी घोषणा केली. त्यानंतर मुंबईतील सगळे चाहते त्या ठिकाणी या वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या सगळ्यांच्या स्वागतासाठी तिथे उपस्थित होते. आता टीम इंडियाच्या चाहत्यांविषयी बोलायचे झाले तर त्यात काही फक्त सर्व सामान्य जनता येत नाही तर सेलिब्रिटी देखील त्यांचे तितकेच मोठे फॅन आहेत. अशात आता मराठमोळा अभिनेता प्रसाद खांडेकरनं देखील यावेळी त्याचा आनंद व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर त्याला पाहून हार्दिकनं ट्रॉफी उचलली असं देखील म्हटलं आहे. 

प्रसादनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये प्रसादनं व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात सुरुवातीला तो टीम इंडियाची बस दिसते. ज्यात सगळे खेळाडू बसलेले असतात. तर दुसरीकडे त्यांच्यातला एक खेळाडू म्हणजेच हार्दिक पांड्या हा ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसल्याचे दिसत होते. त्यानं प्रसादला पाहून ट्रॉफी उचलली असं देखील यावेळी त्यानं सांगितलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हा व्हिडीओ शेअर करत प्रसादनं कॅप्शन दिलं की '...आणि हार्दिकने माझ्याकडे बघून वर्ल्ड कप उंचावला. आज साऊथ मुंबई ला कामानिमित्त जायचंच होत विचार केला की नरिमन पॉईंट ला जाऊन चॅम्पियन्स च्या विजयी मिरवणुकीत पण सहभागी होऊया ... पण न्यूज मधली गर्दी चे फोटो पाहिले आणि जायचा मोह टाळला गप्प पणे बोरिवलीला निघालो...साधारण सांताक्रूझच्या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा गर्दी जमत असलेली दिसली आणि पटकन ट्यूब पेटली की अरे आपले चॅम्पियन्स इथूनच जाणार आहेत नंतर थोड्या वेळात आजूबाजूला पाहिलं तर संपूर्ण हायवेवर गाड्या रस्त्यामध्येच आडव्या टाकून सगळेच टीम इंडियाची वाट बघत होते. क्षणाचाही विलंब न करता गाडीतून उतरलो आणि दुसऱ्या क्षणाला जगजेत्ते गाडीतून समोर आले.' 

हेही वाचा : पहिली पत्नी घराबाहेर जाताच अरमान मलिक का म्हणाला? 'आयुष्य संपवून...'

पुढे हार्दिकसोबतच्या त्या टेलिपथीविषयी बोलताना प्रसाद खांडेकर म्हणाला, 'अगदी आतून मनातल्या मनात त्यांना एक सॅल्युट ठोकला. कदाचित तो मनातल्या मनात अगदी मनापासून ठोकलेला सॅल्युट टेलिपथीनं हार्दिक पांड्या पर्यंत पोहोचला असावा, त्यानं सुद्धा पुढील क्षणाला बसमधून माझ्याकडे बघून वर्ल्ड कपचा कप उंचावला. आयपीएल दरम्यान ज्या मुंबईनं हार्दिकला ट्रोल केलं आज त्याच मुंबईकरांचं स्वागत खुल्या मनानं स्वीकारायला हार्दिक अगदी ड्राइव्हरच्या बाजूला बसलेला. त्याच्या पाठोपाठ अर्ध्या अर्ध्या सेकंदासाठी दर्शन झालं ते द वॉल राहुल द्रविड... गरजेच्या क्षणी उभा राहणार बुम बुम बुमराह... दुखापतीवर मात करून दमदार पुनरागमन करणारा ऋषभ पंत आणि सगळेच आमचा बोरिवलीकर रोहित, विराट, सूर्या सगळ्यांनाच सॅल्युट ठोकायचा होता. भेटतील ते ही असे अचानक... गर्दी जमणे आणि जमवणे यातील फरक पाहिला. स्वागतासाठी अशी गर्दी स्वतःहून जमली पाहिजे. टीम इंडिया चॅम्पियन्स तुम्हालाप्रचंड प्रेम आणि अभिमान मित्रांनो भावांनो'