मुंबईः कॅनेडियन पॉप स्टार जस्टिन बीबर त्याच्या सध्या सुरू असलेल्या 'जस्टिस वर्ल्ड टूर'चा भाग म्हणून भारतात येणार आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये लाइव्ह कॉन्सर्ट असणार आहे. 2017 मध्‍ये मुंबईमध्‍ये त्‍याच्‍या धमाकेदार कामगिरीनंतर भारतातील ही त्याची दुसरी लाईव्ह कॉन्सर्ट असेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


जस्टिन बीबरची 18 ऑक्टोबर 2022 रोजी दिल्लीत लाइव्ह कॉन्सर्ट असणार आहे. त्याच्या मैफिलीच्या तिकिटाची किंमत तुम्हीही अवाक् व्हाल. जस्टीन बीबरच्या शोसाठी रजिस्ट्रेशन सध्या सुरू असून 1 जून रोजी संध्याकाळ 6 वाजेपर्यंत बुकिंग सुरू होणार आहे.



मिळालेल्या माहितीनुसार, बुक माय शोने जस्टिन बीबरच्या या कॉन्सर्टची घोषणा केली आहे. जस्टिन बीबरचा वर्ल्ड टूर या महिन्यापासून मेक्सिकोतून सुरू होत आहे. ऑक्टोबरमध्ये दिल्लीत होणाऱ्या कॉन्सर्टपूर्वी जस्टिन बीबर दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेतही परफॉर्म करणार आहे


दिल्लीत जस्टिन बीबरची कॉन्सर्ट पाहण्यासाठी चाहते बुक माय शोच्या माध्यमातून तिकीट काढू शकतात,  2 जूनपासून बुकिंग सुरू होणार असून 4 जूनपर्यंत हे बुकिंग सुरू असणार आहे. विशेष म्हणजे तिकीट चार हजार रुपयांपासून सुरू होईल. सर्वात महागड्या तिकिटाची किंमत 37 हजार 500 पर्यंत आहे.


कोविड प्रोटोकॉलनुसार, कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रवेशासाठी लसीकरणाचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे