नवी दिल्ली : अभिनेता राहुल बोसकडून २ केळ्यांसाठी ४४२ रुपये घेणं चंदिगड हॉटेलला चांगलंच महागात पडलं आहे. केळी आणि त्यासोबत आलेल्या बिलाचा राहुल बोसने शेअर केलेला व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर आता एक्साइज अॅन्ड टॅक्सेशन डिपार्टमेंटने सीजीएसटीच्या (CGST) कलम ११चे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित हॉटेलवर कारवाई करत, २५ हजार रुपयांचा दंड ठोठवण्यात आला आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल बोस चंदिगडमध्ये एका शूटिंगसाठी आला होता. शूटिंगदरम्यान तो शहरातील ५ स्टार हॉटेलमध्ये थांबला होता. पण हॉटेलकडून आलेल्या एका बिलाने राहुलला चांगलंच हैराण केलं. राहुल बोसने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत, एका अलिशान हॉटेलमध्ये दोन केळ्यांसाठी कशाप्रकारे ४४२ रुपये बिल देण्यात आलं याबाबत सांगितलं.



राहुल बोसचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, हे प्रकरण गांभिर्याने घेत चंदिगडच्या उपायुक्तांनी तसेच एक्साइज-टॅक्सेशन कमिशनरकडून हॉटेल J W Marriott विरोधात उच्चस्तरिय चौकशीचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता हॉटेलवर कारवाई करत दंड ठोठावण्यात आला आहे.