Kabhi Khushi Kabhi Gam Kareena Kapoor: करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम' या चित्रपटाला आज तब्बल 22 वर्षे पुर्ण झाली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं मोठ्या प्रमाणात कमाई केली होती. त्यामुळे याची जोरात चर्चाही होती. करीना कपूरचा हा पहिला वहिला चित्रपट होता. आपल्या डेब्यू चित्रपटाची आठवण काढत तिनं आपल्या इन्स्टाग्राम ऑफिशियल अकांऊटवरून चित्रपटाच्या आठवणी शेअर केल्या आहेत. पू म्हणजे पूजा शर्मा हे पात्र प्रचंड गाजलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूsss हे करीना कपूरच्या तोंडून ऐकण्याची सवय या चित्रपटाच्या प्रत्येक चाहत्याला असेलच. '22 वर्षांनंतरही अजूनही खूप स्ट्रॉग आहे', असं कॅप्शन करीना कपूरनं लिहिलं आहे. सध्या रणवीर सिंहनंही या व्हिडीओखाली एक खास कमेंट केली आहे. 


त्यानं लिहिलंय की, ''हे बेब्स. रॉकी रांधवा दीस साईड''. त्याच्या या कमेंटखालीही नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. करण जोहरनंही आपल्या इन्स्टाग्राम अकांऊटवरून चित्रपटाची खास झलक शेअर केली आहे. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे. यावेळी करीना कपूरच्या या व्हिडीओलावरही अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी केल्या आहेत. त्यामुळे त्याची बरीच चर्चा आहे. करीना कपूरनं हृतिक रोशनच्या गर्लफ्रेंडची भुमिका केली होती. कभी खुशी कभी गम हा चित्रपट आजही आवर्जून पाहिला जातो. 22 वर्षांनंतरही त्याच्या फॅन क्लबमध्ये आणखी फॅन्सचा समावेश हा होतो आहे. आजच्या पिढीलाही हा चित्रपट आवडतो आहे. 


हेही वाचा : VIDEO: अंशुमन विचारेनं विकत घेतलं नवं घर; चाहत्यांना दाखवली पहिली झलक


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


या चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय आहेत. शाळेमध्ये आणि कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये या चित्रपटातील गाणी ही असायचीच. आताही अनेकदा या चित्रपटातील गाणी कार्यक्रमांमध्ये आणि गॅदरिंगमध्ये ऐकायला मिळतात.