कोण आहे साऊथ स्टार नंदामुरी बालकृष्णची पत्नी, जिच्या स्पर्शानं लोक होतात श्रीमंत?

सध्या सोशल मीडियावर एक क्लिप व्हायरल होताना दिसतेय. ज्यामध्ये साऊथचा सुपरस्टार नंदामुरी बालकृष्ण त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या अभिनेत्रीला धक्काबुक्की करताना दिसत आहे. नंदामुरीच्या अशा या वागण्यावर लोक जोरदार टीका करत आहेत.

| Jun 04, 2024, 18:06 PM IST
1/7

सगळेच करतायत टीका

हा व्हिडिओ पाहून सामान्य जनता असो की सेलिब्रिटी, प्रत्येकजण त्याच्यावर टीका करताना दिसत आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, दाक्षिणात्य चित्रपटातील लोक या अभिनेत्याच्या पत्नीची अक्षरश: देवीप्रमाणे पूजा करत आहेत. 

2/7

वसुंधरा देवी

नंदामुरी बालकृष्ण यांच्या पत्नीचं नाव वसुंधरा देवी आहे. नंदामुरी बालकृष्णनं 1982 मध्ये वसुंधरा देवीसोबत लग्न केलं. वसुंधरा ही देवरापल्ली सूर्य राव यांची मुलगी आहे, जे आंध्र प्रदेशातील SRMT चे मालक होते.  

3/7

सर्वसाधारण जीवन

सुपरस्टारची पत्नी असूनही वसुंधरा अतिशय साधे आणि घरगुती जीवन जगते. निवडणूक रॅली, चित्रपट कार्यक्रमांमध्ये ती अनेकदा नंदामुरीसोबत दिसते.  

4/7

देवीचा दर्जा

नंदामुरी पत्नीबद्दल एक मनोरंजक गोष्ट समोर आली आहे आणि ती म्हणजे, Tupaki.com नं दिलेल्या माहितीनुसार, काही लोक तिला देवीप्रमाणे वागवतात. असे म्हटले जाते की तिला देवाचा विशेष आशीर्वाद मिळाला आहे. ज्यामुळे तिचा आशीर्वाद घेतल्यानं एखादी व्यक्ती रातोरात श्रीमंत होते. 

5/7

वसुंधराच्या हातून पैस घेण्याचा प्रयत्न

घरातील कोणत्याही शुभ कार्यासाठी, प्रसंगासाठी किंवा प्रकल्पासाठी नंदामुरी यांना त्यांच्या पत्नीकडून पैसेही मिळतात. त्याच वेळी, विशेष प्रसंगी लोक वसुंधराच्या हातून पैसे घेण्याचा प्रयत्न करतात. त्याच्याकडून हा आशीर्वाद घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी जमते.

6/7

लोकप्रिय कपल

वसुंधरा ज्याला स्पर्श करते ते शुभ होते, असेही म्हटले जाते. नंदामुरी आणि वसुंधरा हे दक्षिण चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. 

7/7

चार दशकांचा सुखी संसार

चार दशकांहून अधिक काळ त्या दोघांना प्रेक्षकांचे प्रेम लाभले आहे. त्यांना तीन मुलं आहेत. त्यांचं एक सुखी आणि आनंदी कुटुंब आहे.