`मी त्याला थांबवण्याचा प्रयत्य केला पण...`; मुलाच्या निधनानंतर अभिनेता भावुक
`दूर जाण्याचा निर्णय त्याचा होता. आणी तो गेला`, प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाने जीवन संपवण्याता निर्णय घेतल्यानंतर...
Kabir Bedi on his son : बॉलिवूडमध्ये अशा अनेक घटना घडतात. ज्यांच्या आठवणींची चर्चा कायम खास क्षणी होते. काही आठवणी मनाला आनंद देणाऱ्या असतात. तर काही मात्र फक्त वेदना. अभिनेते कबीर बेदी (Kabir Bedi) यांनी देखील आयुष्यात अनेक संकटांना तोंड दिलं. दिग्गज अभिनेते कबीर बेदी यांनी 'Stories I Must Tell: The Emotional Life of an Actor' या पुस्तकात त्यांनी स्वतःच्या जीवनात आलेल्या चांगल्या-वाईट प्रसंगांचा अनूभव देखील शेअर केले आहेत.
1969 साली डान्सर प्रोतिमासोबत कबीर बेदी विवाह बंधनात अडकले. सर्व काही सुरळीत सुरू असताना त्यांचा मुलगा सिद्धार्थने आत्महत्या केली. त्याच्या मृत्यूनंतर प्रोतिमाचेही निधन एका अपघातामध्ये झाले. (kabir bedi movies and tv shows)
मुलाखतीत अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे (kabir bedi wife). ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या मुलाच्या आत्महत्येबद्दलही सांगितलं आहे. त्यांच्या मुलाचं नाव सिद्धार्थ होतं. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्याने आपला जीवन प्रवास संपवलवा. त्याच्याबद्दल बोलताना कबीर म्हणाले, 'तो अत्यंत हुशार होता. तो त्याच्या क्षमतेबद्दल अगदी अद्वितीय होता आणि मग एक दिवस अचानक त्याला गोष्टींचा विचार करता येत नव्हता.'
'मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला काय त्रास होतोय जाणून घेण्याचा प्रयत्न देखील केला. एक दिवस त्याला रस्त्यावर रागात पाहिलं. तेव्हा त्याला सांभाळायला 8 पोलीस पुढे धावून आले. उपचार सुरू केले. तेव्हा त्याला सीजोफ्रेनिया (kabir bedi son) झाल्याचं कळालं. अफाट प्रयत्न करून देखील तो मला सोडून गेला. दूर जाण्याचा निर्णय त्याचा होता. आणी तो गेला...' असं कबीर यांनी मुलाखतीत सांगितलं. (kabir bedi instagram)
ब्रिटीश डिझायनर सुजैन हम्फ्रेस यांच्यासोबतही किरण बेदी रिलेशनशिपमध्ये होते. मात्र त्यांच्यात दुरावा आला. कबीर बेदींनी त्यानंतर निक्की सोबत लग्न केलं. परंतू 2005 साली तिच्यापासूनही कबीर बेदी विभक्त झाले.