मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक प्रेम संबंधावर आधारीत चित्रपट साकारण्यात आले आहेत. पण नुकताच प्रदर्शित झालेल्या 'कबीर सिंह' चित्रपटाला चाहत्यांकडून प्रचंड दाद मिळत आहे. आपले प्रेम आपल्यापासून दूर गेल्यामुळे नशेच्या आहारी गेलेला अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री कियारा आडवाणी यांच्या प्रेमकथे भोवती चित्रपटाची कथा फिरत आहे. बॉक्स ऑफिसवर ही प्रेमकथा चांगलीच गाजताना दिसत आहे. चित्रपटाने प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी २० कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे. 'कबीर सिंह'मधून शाहिद आणि कियारा ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'कबीर सिंह' हा साऊथच्या 'अर्जुन रेड्डी' चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. 'कबीर सिंह' चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रेड्डी वांगा यांनी केले आहे. ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी चित्रपटाच्या कमाईचे आकडे ट्विटरच्या माध्यमातून जाहीर केले आहेत. त्याचप्रमाणे यंदाच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या चित्रपटांची तुलना शाहीदच्या 'कबीर सिंह' चित्रपटासोबत केली आहे.


'कबीर सिंह' चित्रपटात शाहिद कपूर, कियारा आडवाणी, अर्जन बाजवा, कामिनी कौशल, सुरेश ओबेरॉय या कलाकारांनी भूमिका साकारली आहे. संदीप रेड्डी वांगा यांनी अतिशय चित्रपटाची कथा अतिशय सुंदररित्या मांडली आहे. शाहिदने साकारलेल्या 'कबीर'ला त्याने पुरेपुरे दाद दिली आहे. 'कबीर'चा राग, प्रेम, पागलपन, जिद्द, नशेच्या आहारी गेलेला अशा सर्वच भावना त्याने पडद्यावर तंतोतंत उतरवल्या आहेत.