Anjali Arora Bold Dance VideoOn Deepika Padukon's Besharam Rang Song : 'लॉक अप' या रियॅलिटी शोमधून चर्चेत आलेली अभिनेत्री अंजली अरोरा (Anjali Arora) सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. आता असाच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या तिच्या व्हिडिओची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरु आहे. अंजली अरोरानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अंजली अरोरा ही दीपिका पदुकोणच्या बेशरम रंग या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. (Anjali Arora Viral Video) 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


सध्या बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या ‘पठाण’ चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharm Rang) हे गाणं सध्या ट्रेंडमध्ये आहे. अनेक कलाकार या गाण्यावर डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. आता अंजली अरोरानं देखील या गाण्यावरील डान्सचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंजली खूपच ग्लॅमरस दिसत आहे. तर, तिच्या डान्स मूव्ह्स देखील दीपिकाप्रमाणेच धुमाकूळ घालत आहेत. 'कच्चा बदाम'नंतर आता अंजली अरोराचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


काय आहे भगव्या रंगाचा वाद 


'बेशरम रंग' गाण्यात दीपिकानं परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून हा वाद सुरु झाला आहे. या वादात अनेक मंत्री, अभिनेते आणि अभिनेत्री प्रतिक्रिया देत असताना अयोध्येतील जगद्गुरू आणि तपस्वी छावणीचे संत परमहंस आचार्य (Sant Paramhans Acharya) यांनी शाहरुख खानला धमकी दिली आहे. शाहरुख खान भेटला तर त्याला जिवंत जाळेन अशी धमकी देण्यात आलीय.भाजपच्या मंत्र्यांसह विश्व हिंदू परिषदेने (विहिप) तीव्र विरोध दर्शवला असून त्यात बदल करण्याची मागणी केली आहे. तर इतर पक्षांचे नेते आता सिनेमा आणि सिनेमातील कलाकारांना पाठिंबा देताना दिसत आहेत.


हेही वाचा : Deepika Padukone नंतर या अभिनेत्रीनं परिधान केली भगव्या रंगाची बिकीनी, फोटो Viral


दरम्यान काही महिन्यांपूर्वी अंजली अरोराचे (Anjali Arora) नाव एका एमएमएस लीकशी (MMS Leak) जोडले गेले होते. ज्यामुळे तिची खुप बदनामी झाली होती. मात्र तरीही ती घाबरली नाही तिने इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली. सध्या तिने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओची एकच चर्चा आहे.