`कच्च्या बादाम` रील्स फेम अंजली अरोराची लोकप्रियता वाढली; यामुळे होतेय ट्विटरवर ट्रेंड
Anjali Arora Trending On Twitter: कच्च्या बदामावर रील बनवून इंस्टाग्रामवर रातोरात प्रसिद्ध झालेल्या अंजली अरोराची चाहत्यांमध्ये क्रेझ वाढत आहे.
मुंबई : Anjali Arora Trending On Twitter: कच्च्या बदामावर रील बनवून इंस्टाग्रामवर रातोरात प्रसिद्ध झालेल्या अंजली अरोराची चाहत्यांमध्ये क्रेझ वाढत आहे.
Instagram वर 11.1M फॉलोअर्स
Instagram वर ट्रेंडिंग गाणं कच्च्या बदामचं रील बनवून रातोरात प्रसिद्ध झलेली स्टार अंजली अरोरा हिच्या फॅन फॉलोइंगमधे मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तिचे इंस्टाग्रामवर 11.1M फॉलोअर्स आहेत.
सोशल मीडिया
सोशल मीडियावर तिचे फॅन फॉलोइंग पाहून तिला कंगना राणौतच्या लॉक अप शोमध्ये स्पर्धक म्हणून सामील करण्यात आले. अंजली अरोरा हिने आपल्या निरागसतेने सर्वांची मने जिंकली आणि शोच्या अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला.
मुनांजली ट्रेंड
शोदरम्यान अंजलीची कॉमेडियन मुनव्वरसोबतची केमिस्ट्री लोकांना आवडली. इतकेच नाही तर सोशल मीडियावर लोकांनी मुनांजली नावाचा ट्रेंडही सुरू केला.
मुनव्वर आणि अंजली
शो संपल्यानंतर अंजली अरोरा घरी परतली. शोमध्ये मित्र झालेल्या मुनव्वर आणि अंजली दोघेही बाहेर आल्यानंतर आपआपल्या बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत दिसून येत आहेत. असे असतानाही मुनव्वर आणि अंजली यांची नावे पुन्हा पुन्हा जोडली जात आहेत.
अंजली अरोरा ट्विटरवर ट्रेंड
इतकंच नाही तर अंजली अरोरा तिच्या नुकत्याच झालेल्या मुलाखतीमुळे ट्विटरवर ट्रेंड करत आहे. मुलाखतीदरम्यान, जेव्हा अंजलीला मुनव्वरची मैत्रीण नजीलाबाबत विचारण्यात आले. तेव्हा तिने सांगितले की लॉकअपच्या सक्सेस पार्टीत त्यांने नजीला आणि माझी ओळख करून दिली होती.