Kacha Badam Anjali Arora in Ramayan Movie : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतच्या लॉकअप या ओटीटी प्लॅटफॉर्मवर असलेल्या शोमधून अंजली अरोराला खूप लोकप्रियता मिळाली. त्याआधी तिनं कच्चा बादाम या गाण्यामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वत: चं स्थान निर्माण केलं होतं. त्यानंतर अंजली सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असायची. आता अंजलीविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. यात असं म्हटलं आहे की चित्रपटात पदार्पण करण्यासाठी ती सज्ज आहे. इतकंच नाही तर पहिलाच चित्रपट हा रामायण असून त्यात ती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अंजलीनं यावर वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंजलीचा चाहता वर्ग हा खूप मोठा आहे. तिचे इन्स्टाग्राम अकाऊंटवरचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. अंजलीनं ही मुलाखत ई टाइम्सला दिली आहे. तिच्या चित्रपटाच्या डेब्यूविषयी मत व्यक्त केलं आहे. अंजली अरोरानं सांगितलं की यात ती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. मी स्वत: ला खूप सौभाग्यशाली समजते कारण मला या भूमिकेसाठी ऑफर मिळाली आहे. अनेक मुलींच्या ऑडिशननंतर मला ही संधी दिली आहे. कारण सीतेची भूमिका ही नेहमीच कठीण असते असं म्हटलं जातं. त्यासाठी स्पेशल वर्कशॉप क्लासेस देखील घेतले होते. पुस्तकं वाचली आणि त्यासोबत अनेक व्हिडीओ देखील पाहिले. कारण तेव्हाच मी माझ्या भूमिकेला 100 टक्के देऊ शकेल. दरम्यान, अभिषेक सिंग श्री रामायणचं दिग्दर्शन करत आहेत. रामानंद सागर यांची रामायण ही मालिका चांगलीच गाजली होती. दीपिका चिखलिया यांनी सीतेची भूमिका साकरली होती. दरम्यान, आता अंजलीला या भूमिकेत पाहण्यासाठी तिचे काही चाहते उत्सुक आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हेही वाचा : 'भक्षक'नंतर आता 'या' बॉलिवूड चित्रपटात दिसणार सई ताम्हणकर! अभिनेत्रीसाठी 2024 ठरतंय खास


काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावर एक एमएमएस व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओला पाहून अनेकांनी दावा केला होता की त्यात दिसणारी मुलगी ही अंजली अरोरा होती. मात्र, अंजलीनं ते खोटं असल्याचं म्हटलं होतं. अंजली अरोरानं या विरोधात पोलिसात तक्रार केली होती. तिच्या कॅरेक्टविषयी अफवा पसरवल्याचा दावा करत तिनं अॅक्शन घेत हे पाऊल उचललं होतं.