दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी एका अभिनेत्रीच्या हत्येने हादरली आहे. 'कदैसी विवासयी' (Kadaisi vivasayi) चित्रपटातील अभिनेत्री कासियाम्मल यांची 4 फेब्रुवारीला हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, अभिनेत्रीची तिच्याच मुलाने हत्या केली आहे. मुलाने 4 फेब्रुवारीला बेदम मारहाण करत अभिनेत्रीला ठार केलं. पहाटे 9 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. त्या 74 वर्षांच्या होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2021 मध्ये प्रदर्शित झालेला तामिळ चित्रपट 'कदैसी विवासयी' मधील आपल्या भूमिकेने कासियाम्मल यांना प्रसिद्धी मिळवून दिली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 4 फेब्रुवारीला पहाटे 3 वाजता त्यांची हत्या करण्यात आली. मद्य खरेदी करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने मुलाने लाकडाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. 


ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी 'कदैसी विवासयी' हा राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट होता. मनिकंदन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटात विजय सेथुपतीने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. 


मुलासह झालेल्या भांडणातून हत्या


4 फेब्रुवारी रोजी कासियाम्मलवर तिचा मुलगा नम्माकोडीने लाकडी स्लॅबने हल्ला केल्याने गंभीर जखमी झाली होती. दारू खरेदीवरून त्यांच्यात वाद झाला होता. वाद सुरू असताना कासियाम्मलने आपल्या मुलाला पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या मुलाने तिची हत्या केली. पोलिसांनी घरातून लाकडी स्लॅब जप्त केला आहे.


पोलिसांनी आरोपी मुलगा 51 वर्षीय नम्माकोडीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर कलम 302 अंतर्गत हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. नम्माकोडी आपल्या मुलापासून विभक्त झाला होता आणि पैशांसाठी आईवर अवलंबून होता. पोलिसांनी आपण हत्येसाठी वापरलेलं शस्त्र जप्त केलं असून, तपास सुरु असल्याची माहिती दिली आहे. 



'कदैसी विवासयी' चित्रपटाची कथा काय आहे?


दिग्दर्शक मणिकंदन यांच्या 'कदैसी विवासयी' चित्रपटात दिवंगत अभिनेता नल्लंदी आणि विजय सेथुपती होते. चित्रपटात शेतकऱ्यांचं आयुष्य दाखवण्यात आलं आहे. हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला होता. 1 फेब्रुवारी 2022 रोजी चित्रपट प्रदर्शित होण्याआधी नल्लंदी यांचं निधन झालं होतं. त्यांनी 69 व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मरणोत्तर विशेष पुरस्कार देण्यात आला.