मुंबई : २०२० वर्षाच्या सुरूवातीलाच सिनेसृष्टीतून धक्कादायक गोष्टी समोर आल्या. एप्रिल महिन्याच्या अखेरीस अभिनेता इरफान खान आणि त्यापाठोपाठ अभिनेता ऋषी कपूर यांच निधन झालं. मे महिन्यात असाच एक लोकप्रिय कलाकार आपल्याला सोडून गेला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीव्ही मालिकेतील लोकप्रिय अभिनेता सचिन कुमार यांच १५ मे रोजी निधन झालं. वयाच्या ४२ व्या वर्षी सचिन कुमार यांच निधन झालं. याची माहिती सिनेमा समीक्षक आणि लेखक सलिल अरूण कुमार यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून दिली. (लॉकडाऊनमध्ये शाहरूख खानने गमावली जवळची व्यक्ती) 


 



सचिन कुमार यांच्या अगोदर इरफान खान आणि ऋषी कपूर हे जग सोडून गेले. या दोन्ही अभिनेत्यांनी शेवटपर्यंत कॅन्सरशी दोन हात केले. अखेर कॅन्सरमुळे त्यांच निधन झालं. सलिल यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे की,'आपण एकत्र काम केलं. पण कुणाकडून तरी कळलं की तुम्ही या जगात नाहीत. हे खूपच धक्कादायक होतं. मुंबईत राहत्या घरी हार्ट अटॅकने निधन झालं. जगभरात कोरोनाची दहशत पसरली आहे तर सिनेसृष्टीत दिग्गज कलाकारांच असं जाणं प्रत्येकालाच धक्कादायक आहे. ' 



सचिन कुमार हे अभिनेता अक्षय कुमारचे नातेवाईक आहेत. खूप दिवसांपूर्वीच सचिन यांनी अभिनय क्षेत्र सोडलं होतं. मात्र त्यांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या आजही मनात घर करून आहेत. सचिन यांनी 'कहानी घर घर की' आणि 'लज्जा' सारख्या लोकप्रिय मालिकेत काम केलं आहे.