मुंबई : अभिनेत्री काजल अग्रवाल आई झाली आहे. ही आनंदाची बातमी ऐकून काजलच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. पिंकविलाने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, काजलने मुलाला जन्म दिला. आता अभिनेत्रीने मुलाच्या नावाची घोषणा केली आहे. काजलने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामधून काजने मुलाच्या नावाची घोषणा केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाच्या नावाची घोषणा करत काजल म्हणाली, 'आम्हाला 19 एप्रिल 2022 रोजी नील किचलूच्या जन्माची घोषणा करताना आनंद होत आहे...' यावेळी फोटोमध्ये आई-वडील, आजी-आजोबा आणि काकी-काका यांचं नाव देखील लिहिलं आहे. 



सध्या छोट्या निलच्या स्वागताची पत्रिका सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. काजल अग्रवालने २०२२ च्या सुरुवातीला एका पोस्टद्वारे चाहत्यांना तिच्या गरोदरपणाची माहिती दिली होती. गर्भधारणेच्या काळात ती खूप सक्रिय होती. 


काजल अग्रवालने 30 ऑक्टोबर 2020 रोजी गौतम किचलूशी लग्न केले. या जोडप्याच्या लग्नाच्या फंक्शन्समध्ये जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. काजलचा नवरा गौतम हा फिल्म इंडस्ट्रीतील नसून एक बिझनेसमन असल्याची माहिती आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांची पहिली भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. सुरुवातीला दोघांची मैत्री झाली आणि नंतर बघता बघता या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न केले.