काजल लवकरच अडकणार विवाह बंधनात
तिच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी उद्योगपती मुलाची निवड केली आहे.
मुंबई : दाक्षिणात्य कलाविश्वतील प्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याची बातमी समोर येत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत तिने आपण प्रेम विवाह नाही तर घरच्यांच्या पसंतीच्या मुलासोबत लग्न करणार असल्याचे सांगीतले होते. त्यामुळे काजल ज्या मुलासोबत लग्न करणार आहे, त्याची निवड तिच्या आई-वडिलांनी केली आहे.
तर काजल २०२० मध्ये विवाह बंधनात अडकणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार ती एका उद्योगपतीसोबत लग्न करणार आहे. तिच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी उद्योगपती मुलाची निवड केली आहे.
अभिनेता अजय देवगन स्टारर 'सिंघम' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या काजलच्या चाहत्य़ांची संख्या फार मोठी आहे. गेल्या दोन वर्षांपासून तिच्या लग्नाच्या चर्चा वाऱ्यासारख्या पसरत आहेत. परंतु त्यावेळेस तिने इंडस्ट्रीमधील कोणात्याही मुलासोबत लग्न करण्यास नकार दिला होता.
काजलने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. याच दरम्यान ती एका अभिनेत्याच्या प्रेमात देखील पडली, परंतु त्यांचं प्रेम फार काळ टिकलं नाही. त्यानंतर तिने स्वत:च्या कामाला लक्ष्य बनवलं.