`डोक्यावर हेडफोन आणि कानाला फोन!` काजोलच्या लेकीच्या `त्या` व्हिडीओवरून नेटकऱ्यांनी घेतली फिरकी
Kajol`s Daughter Nysa Trolled : काजोलची लेक नीसाचा विमानतळावरील हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Kajol's Daughter Nysa Trolled : बॉलिवूड अभिनेत्री काजोल आणि अजय देवगणची लेक नीसा देवगण ही लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे. नीसा ही नेहमीत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या नीसा देवगण चर्चेत येण्याचं कारण तिचा व्हिडीओ आहे. नीसाचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सगळीकडे याचीच चर्चा रंगली आहे. यावेळी तिनं केलेल्या एका कृत्यानं नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला आहे.
नीसाचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत नीसाच्या डोक्यावर हेडफोन असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे तिनं कानाला फोन देखीला लावला आहे. नीसाचा हा अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत नाही आहे. नेटकरी तिच्या या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओवर कमेंट करत तिला प्रश्न करताना दिसत आहेत.
नीसा देवगणच्या या व्हिडीओवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'डोक्यावर हेडफोन आणि त्याच्याशी बोलते?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'हेडफोन लावून फोनवर कोणं बोलतं?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'असं वाटतंय की नीसा तिच्या डोक्यावर हेडफोन लावायला विसरली आहे.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'जरा तिचा अॅटिट्यूड तर बघा.' दुसऱ्या नेटकऱ्यानं मजेशीर कमेंट करत म्हटलं की 'हेडफोन बोलत असेल, मी काय करू, नोकरी सोडून देऊ?'
काजोलनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती आणि त्यात तिनं लिहिलं की 'मी माझ्या मुलीला तिचा अॅटिट्यूड ठीक करण्यास सांगितलं, त्यावर ती मला म्हणाली की याची तक्रार करण्यासाठी तुला मला ज्यांनी बनवलं त्यांच्याशी संपर्क साधावा लागेल'. तर कालोजनं तिच्या या पोस्टमधून लेकीच्या उत्तराची स्तुती केली होती.
हेही वाचा : मुंबई पोहोचताच नताशानं 'या' अभिनेत्यासोबत शेअर केला पोस्ट वर्कआऊट सेल्फी; म्हणाली 'सेका...'
काजोल आणि अजय देवगन या दोघांनी अनेकदा बऱ्याच मुलाखतींमध्ये खुलासा केला की त्यांची लेक नीसाला चित्रपटसृष्टीत येण्याची कोणत्याही प्रकारची इच्छा नाही. अजय देवगननं सांगितलं की तिला आयुष्यात जे काही करायचं आहे, ते ती करू शकते, पण सध्या तिची चित्रपटांमध्ये येण्याची इच्छा नाही. तर पुढे त्यांनी सांगितलं की प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर हा निर्णय तिचा असेल आणि आम्ही तिच्या निर्णयाचा सन्मान करतो.