Natasa Stankovic Photo With This Actor : सर्बियन अभिनेत्री आणि मॉडेल नताशा स्टॅनकोविक ही घटस्फोटाचा खुलासा केल्यानंतर मुंबईत परतली आहे. क्रिकेटपटू हार्दिक पांड्याशी विभक्त झाल्यानंतर नताशा तिचा मुलगा अगस्त्यसोबत सर्बिया गेली होती. दिड महिने सर्बियामध्ये असलेल्या नताशानं तिच्या मुलाचा अगस्त्यचा चौथा वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर ती आता भारतात परतली आहे. मुंबईत परतल्यानंतर नताशानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.
मुंबईत आल्यानंतर नताशानं अगस्त्यला हार्दिकडे सोडलं आणि तिच्या जुन्या मित्रांसोबत वर्कआऊट सेल्फी शेअर केला आहे. आता सगळ्यांना तिची ही स्टोरी पाहून हा प्रश्न पडला आहे की तो मित्र कोण आहे? नताशाच्या या मित्राचं नाव अॅलेक्झॅन्डर अॅलेक्स इलिक आहे. तर कथितपणे अॅलेक्झॅन्डर अॅलेक्स इलिक हा दिशा पटानीचा कथित बॉयफ्रेंड आहे. या फोटोंमध्ये नताशानं काळ्या रंगाचे टाइट्स आणि चष्मा आणि नियॉन रंगाचं क्रॉप टॉप परिधान केलं आहे. नताशानं अॅलेक्झॅन्डरसोबत तिचा पोस्ट वर्कआऊट सेल्फी शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत ‘सेका’ असं तिनं कॅप्शन दिलं आहे. ‘सेका’चा अर्थ कोणाला आपण प्रेमानं हनी, डार्लिंग, स्वीटहार्ट असा आहे.
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, अॅलेक्झॅन्डर देखील सर्बियाहून भारतात आला आहे. तो गेल्या 7 वर्षांपासून भारतात राहून मॉडेलिंग आणि अभिनेता म्हणून काम करतोय. स्वत: ची ओळख निर्माण करण्यासाठी अॅलेक्झॅन्डर सतत प्रयत्न करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अॅलेक्झॅन्डर सगळ्यात आधी तेव्हा चर्चेत आला होता जेव्हा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘वीरे दी वेडिंग’ या कॉमेडी चित्रपटाच्या ‘तारीफां’ या गाण्यात सोनम कपूरसोबत दिसला होता.
दरम्यान, नताशा मुंबईत आल्यानंतर आता अगस्त्य हा हार्दिक पांड्याच्या कुटुंबासोबत आहे. हार्दिकची वहिणी पंखूडीनं सोशल मीडियावर अगस्त्यसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओत अगस्त्य आणि तिचा मुलगा दोघांना मांडीवर बसवून पंखूडी ही गोष्ट सांगताना दिसते. त्यासोबत त्या दोघांसोबत ती क्वालिटी टाईम घालवत असल्याचे दिसत आहे.
हेही वाचा : अखेर लंडनवरून भारतात परतली अनुष्का शर्मा! तिच्यात झालेला बदल पाहून नेटकरी हैराण
दरम्यान, नताशा स्टेनकोविक आणि हार्दिक पांड्यानं 2020 मध्ये लग्न केलं. अत्यंत साध्या पद्धतीनं त्यांनी लग्न केलं. गेल्या वर्षी हार्दिक आणि नताशानं धूम-धाममध्ये पुन्हा एकदा लग्न केलं. यावेळी नताशा आणि हार्दिक हे दोघेही ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीनं लग्न बंधनात अडकले. दरम्यान, जुलैमध्ये त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत विभक्त झाल्याचे सांगितले. पण त्यावेळी त्यांनी हे देखील सांगितलं की ते मिळून त्यांच्या मुलांचा सांभाळ करणार आहेत.
VAN-W
|
VS |
SAM-W
|
Vanuatu Women beat Samoa Women by 9 runs | ||
Full Scorecard → |
SAM-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Samoa Women by 4 wickets | ||
Full Scorecard → |
VAN-W
|
VS |
PNG-W
|
Papua New Guinea Women beat Vanuatu Women by 35 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.