Nysa Devgn Trolled for Sudden Transformation: बॉलीवूडमधील (Bollywood) कलाकार हे कोणत्या न कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्या चाहत्यांना नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासंबंधी उत्सुकता लागलेली असते. अनेकदा त्यांच्या मुलांकडे देखील फार लक्ष दिले जाते. त्यांच्या मुलांबाबतीतल्या बातम्या वारंवार व्हायरल होत असतात. मग त्यांचे फोटो असतील किंवा व्हिडिओ. असे अनेक स्टारकिड्स (Star kids) आहेत जे त्यांच्या अनेक फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत असतात, अशीच एक स्टारकिड न्यासा देवगण देखील आहे. न्यासा ही काजोल (Kajol) आणि अजय देवगणची (Ajay Devgn) मुलगी आहे. सध्या तिनं तिच्या ब्युटी ट्रान्सफॉर्मेशनने (Beauty Transformation) सगळ्यांनाच धक्का दिला आहे. तिच्यामध्ये झालेल्या बदलामुळे अनेकांचा विश्वास बसत नाहीये. न्यासाला सोशल मीडियावर (Social media) खूप ट्रोल (Troll) केले जाते पण आता, न्यासाची आई, काजोलने तिच्या मुलीचे सौंदर्य रहस्य (Beauty Secrets) उघड केले आहे. (kajol and ajay devgn daughter nysa devgn Trolled for sudden transformation nz)



न्यासा देवगणच्या सौंदर्य परिवर्तनावर आश्चर्य


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यासा देवगणच्या सौंदर्य परिवर्तनावर कोणाचाही विश्वास बसत नाही. तिनं तिच्या बोल्ड अंदाजाने सगळ्यानाच निशब्द केलं आहे. अनेक तिच्या या नवीन लूकवर (New look) आश्चर्यचकित झाले आहेत. अलीकडेच मनीष मल्होत्राच्या (Manish Malhotra) एका दिवाळी पार्टीत न्यासाला पाहून अनेकांनी स्टारकिडला ओळखण्यासही नकार दिला. तिचे सध्या अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.


हे ही वाचा - 'या' लोकप्रिय अभिनेत्रीचं दीर्घ आजारानं निधन!


 



अजय देवगण-काजोलची मुलगी ट्रोल 


न्यासाच्या फोटोंवर अनेक कमेंट येत आहेत की तिने असे काय केले आहे की ती अचानक इतकी वेगळी आणि ग्लॅमरस (Glamours) दिसू लागली आहे. बहुतेक लोकांना असे वाटते की न्यासाच्या चेहऱ्यातील बदल हे शस्त्रक्रिया आणि  बोटॉक्स इंजेक्शनला जाते. आता एका मुलाखतीत काजोलने याबाबत खुलासा केला आहे.



आई काजोलने आपल्या मुलीच्या सौंदर्याचे रहस्य उघड


काजोलने एका मुलाखतीत हा मुद्दा मांडला आणि तिच्या मुलीच्या परिवर्तनामागील रहस्य उघड केले. काजोलने सांगितले की तिला न्यासाकडून ब्युटी टिप्स (Beauty tips) घेणे देखील आवडते कारण ती या सर्व गोष्टींची खूप काळजी घेते. काजोल म्हणते की न्यासा इंटरनेटवर खूप सक्रिय आहे आणि तिला ब्युटी हॅकबद्दल बरेच काही माहित आहे.


 



 


हे ही वाचा - 'Sunscreen 1800 रुपये आणि....', ब्रँडच्या वारेमाप दरांनंमुळे Deepika Padukone ला नेटकऱ्यांनी झोडपले


 



न्यासाची ब्युटी रुटीन 


काजोलने मीडियाला सांगितले की, न्यासा आठवड्यातून तीनदा फेस मास्क वापरते आणि काजोलला ही वापरण्यास आग्रह करते. एवढेच नाही तर वडिलांप्रमाणे न्यासाही फिटनेसची (Fitness) विशेष काळजी घेते आणि दररोज योगा आणि कार्डिओ करते. डाएटबद्दल बोलायचे झाले तर रिपोर्ट्सनुसार, न्यासा देवगन तिच्या दिवसाची सुरुवात रिकाम्या पोटी दोन ते तीन ग्लास गरम पाणी पिऊन करते. यानंतर, ती उकडलेली अंडी, ताजी फळे आणि ओटमील नाश्ता करते.