`विमान अपघातात तुमच्या लेकीचं निधन झालं`; काजोलच्या आईला तो फोन कॉल आला अन्...
Kajol Fake Death News : काजोलनं कपिल शर्माच्या `द ग्रेट इंडियन कपिल शो` मध्ये हा खुलासा केला आहे.
Kajol Fake Death News : लोकप्रिय कॉमेडीयन कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' चा दुसरा सीझन सुरु झाला आहे. त्याच्या या शोमध्ये वेगवेगळे सेलिब्रिटी येतात आणि त्यांच्या प्रोजेक्टविषयी किंवा इतर कोणत्या गोष्टींविषयी चर्चा करताना दिसतात. दरम्यान, यावेळी त्याच्या शोमध्ये 'दो पत्ती' या चित्रपटाच्या टीमनं हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा केली. त्यावेळी नेहमी प्रमाणे कपिलनं अनेक मजेशीर गोष्टींविषयी बोलत असताना त्या कलाकारांविषयी सुरु झालेल्या विचित्र अफवांविषयी विचारलं त्यावेळी काजोलनं सांगितलेल्या एका गोष्टीनं सगळ्यांना आश्चर्य झालं.
खरंचर कपिलनं विचित्र अफवांविषयी विचारताच काजोल म्हणाली मला कधीच काही गूगल करण्याची गरज पडली नाही, कारण जर माझ्याविषयी काही विचित्र अफवा सुरु झाली तर लोकं मला कॉल करतील किंवा मला पाठवतील की हे बघ काय विचित्र अफवा सुरु आहे. कपिलनं लगेच काजोलला विचारलं की कोणती बातमी होती तर काजोल ती अफवा सांगत म्हणाली, दर 5-10 वर्षांमध्ये एक बातमी येते की माझं निधन झालं आहे. सोशल मीडिया येण्या आधी देखील अशा बातम्या आल्या आहेत. एकदा तर कोणी माझ्या आईला फोन करून सांगितलं होतं की विमान अपघातात माझं निधन झालं आहे. त्यावेळी तर सोशल मीडिया नव्हतं, त्यामुळे माझ्या आईला माझा येई पर्यंत प्रतीक्षा करावी लागली. सध्या असं अनेकदा झालं आहे, मला वाटतं की एक व्हिडीओ व्हायरल झाला की माझं निधन झालं.
हेही वाचा : CID Promo : मैत्रित आला दुरावा; ACP प्रद्युमन समोरच अभिजीतनं दयावर का झाडली गोळी?
त्यानंतर मस्करीत कपिलनं मस्करीत काजोलला विचारलं की काजोल मॅम, तुम्ही आता पोलिसाची भूमिका साकारत आहात, तर अजय सरांनी तुम्हाला 'आता माझी सटकली' हे बोलायला शिकवलं होतं? काजोलनं उत्तर दिलं की तिनं तिच्या नवऱ्याकडून कोणताही सल्ला घेतला नाही. पुढे मस्करीत काजोल म्हणाली तू हे विसरलास का की मीच त्याला सिंघमसाठी ट्रेनिंग दिली होती. त्यामुळे मला त्याच्याकडून सल्ला घेण्याची गरज भासली नाही. त्याशिवाय तिनं सांगितलं की तिनं अजयला सिंघमसाठी मराठी भाषा शिकण्यात मदत केली.