Kajol On No Kissing Policy : बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या 'द ट्रायल' या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. काजोलनं या सीरिजसाठी तिची 29 वर्षांची नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. काजोलनं आजवर अनेक रोमॅन्टिक चित्रपट केलेत. पण त्यात तिनं कधीच किस केलं नाही. मात्र, या सीरीजसाठी काजोलनं तिची ही पॉलिसी मोडली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजोलनं या सीरिजसाठी तिची नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. तिनं यावेळी 2 अभिनेत्यांना किस केलं आहे. तिच्या या किसिंग सीन्सवर सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु असताना आता काजोल त्यावर मोकळेपणानं बोलली आहे. काजोलनं नुकतीच ‘एएनआय’ला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत काजोल म्हणाली, "मी माझ्या आयुष्यात ‘लोग क्या कहेंगे’ याचा विचार कधीच केलेला नाही, समाजातील लोक माझ्याबद्दल काय विचार करतील याचा मला काही फरक पडत नाही. कारण, माझ्या आईनं खूप खंबीरपणे मला वाढवले आहे. तिने स्वत: कधीच समाज काय बोलेल याचा विचार केला नाही. खरंतर माझी आजी, आई यांनी नेहमीच मला हेच शिकवलं की, तुझे आयुष्य हे पूर्णपणे तुझे आहे आणि तुझ्या आयुष्यातील निर्णयांसाठी तुचं जबाबदारी आहे. तुमच्या विषयी इतरांची काय मतं आहेत हे कधीच महत्त्वाचं नसतं."


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


याविषयी पुढे सांगत काजोल म्हणाली, “मला असं वाटतं की आपल्या आयुष्याची जबाबदारी आपण स्वत: घेतलीच पाहिजे. माझ्या आजी-आजोबांनी कायम हिच शिकवण मला दिली. तसेच माझी आई पण तिच्या इच्छेप्रमाणे आयुष्य जगते. मी सुद्धा त्यांच्यासारखे जीवन जगण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे, तुम्ही काय करायचे हे ठरवण्याचा हक्क समाजाला नसतो हे आपण कायम लक्षात ठेवले पाहिजे.”


हेही वाचा : शाहरुख खाननं 1996 साली आमिरसाठी घेतलेला लॅपटॉप अभिनेत्यानं कधी वापरलाच नाही; कारण सांगत म्हणाला...


काजोलची द ट्रायल ही सीरिज ‘द गुड वाईफ’ शोचा हिंदी रिमेक आहे. या शोचे आधीच जपानी आणि साऊथ कोरियन रिमेक आधीच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. त्यांची लोकप्रियता पाहता आता त्याचा हिंदी रिमेकही करण्यात आला आहे. या वेब सीरिजमध्ये काजोल, जीशू सेनगुप्ता, ब्रिटीश-पाकिस्तानी अभिनेता अली खान, कुब्बरा सैत, शीबा चड्ढा, गौरव पांडे आणि आमिर अली हे कलाकार आहेत. ही सीरिज 14 जुलै रोजी प्रदर्शित झाली असून तुम्ही डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.