...मग अंजलीनं राहुल नाही तर अमनशी लग्न केलं असतं; 24 वर्षांनंतर Kajol नं व्यक्त केली इच्छा
Kajol on Kuch Kuch Hota Hai end : काजोलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे Kuch Kuch Hota Hai या चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे. त्याशिवाय करिअरच्या सुरुवातीला तिच्या दिसण्यावरून किंवा मग तिच्या रंगावरून आणि ती जाड आहे अशा अनेक कमेंट केल्या होत्या, याविषयी काजोल बोलली आहे.
Kajol on Kuch Kuch Hota Hai end : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) आणि अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'कुछ कुछ होता है' (Kuch kuch hota hai) या चित्रपटानं प्रदर्शित होताच सगळ्यांना वेड लावलं होतं. हा चित्रपट प्रदर्शित होऊन 24 वर्ष झाली, या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वरचे सगळे रेकॉड मोडले होते. या चित्रपटात शाहरूख आणि काजोल यांची मुख्य भूमिका असली तरी सलमान खान आणि राणी मुखर्जी यांनी सपोर्टींग भूमिका साकारल्या होत्या. चित्रपटाच्या क्लायमेक्समध्ये राहुल आणि अंजली एकत्र येतात. अमनशी ठरलेलं लग्न मोडत अंजरी राहुलशी लग्न करते. आता इतक्या वर्षांनंतर काजोलनं ती जर चित्रपटाची दिग्दर्शक असती तर तिनं चित्रपटाचा क्लायमेक्स कसा ठेवला असता ते सांगितले आहे.
काजोलने 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' या इन्स्टाग्राम पेजला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत काजोलला विचारण्यात आले की जर अंजलीची भूमिका तिच्या म्हणण्यानुसार चित्रपटात पुढे दाखवण्यात आली असती तर क्लायमॅक्स काय असता? अंजलीनं राहुल आणि अमनपैकी कोणाला निवडलं असतं? या प्रश्नावर काजोल म्हणाली, 'माझ्याप्रमाणे जर अंजली ही भूमिका असती तर तिनं कधीच साडी नेसली नसती. ती नेहमी ट्रॅक पँट घालत राहिली असती आणि कॉलेज जीवनात जशी दिसायची तशीच सुंदर दिसली असती. महागडे शूज घातले असते.'
'कुछ कुछ होता है' चित्रपटात काजोलचे दोन व्हर्जन पाहायला मिळाले. एक कॉलेज जीवनातील एक शॉर्ट केसांची टॉम बॉय मुलगी जी राहुलवर एकतर्फी प्रेम करते. जो तिचा खूप चांगला मित्र आहे. तर त्यानंतर 8 वर्षांनी एका टिपिकल भारतीय पेहरावातील लांब केस वाढवून आणि साडी नेसणारी मुलगी.
हेही वाचा : 'शाकुंतलम' चित्रपटाच्या सततच्या प्रमोशनमुळे Samantha च्या आरोग्यावर गंभीर परिणाम, आवाज गेला अन्...
दरम्यान, करण जोहरनं 2019 साली दिलेल्या मुलाखतीत त्याच्या 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाला 'राजकीयदृष्ट्या चुकीचे' म्हटले होते. 'इंडियन एक्स्प्रेस' ला दिलेल्या मुलाखतीत करण म्हणाला होता की 'मला शबाना आझमीजी यांनी फोन केला, इतकंच काय तर त्या रागावल्या होत्या. त्यावेळी त्या म्हणाल्या ती तू काय दाखवलं आहेस. मुलगी शॉर्ट केसांची असेल तर ती सुंदर दिसत नाही का, दुसरीकडे जेव्हा तिचे लांब केस असतात आणि साडी नेसते तेव्हा ती सुंदर दिसते? तुला काय म्हणायचं आहे? त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर मला माझी चूक कळली आणि मी लगेच त्यांची माफी मागितली.