Kajol Trolled and Compared to Jaya Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. काजोल नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तव्यांसाठी ओळखली जाते. ती सगळ्यांसमोरही अनफिल्टर्ड राहते. हेच काही लोकांना तिच्याविषयी आवडतं तर काही लोकांना ते आवडत नाही. या सगळ्यात तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओला पाहिल्यानंतर नेटकरी काजोलची तुलना ही जया बच्चन यांच्याशी करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काजोलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मानव मंगलानी सेलिब्रिटी फोटोग्राफरनं शेअर केला आहे. या व्हिडीओत काजोल तिचा मुलगा युगला घेऊन डॉक्टरांच्या क्लिनीकमधून बाहेर पडताना दिसत आहे. या व्हिडीओत काजोलनं काळ्या रंगाची कुर्ती आणि जीन्स परिधान केली आहे. तर युगच्या चेहऱ्यावर तो आजारी असल्याचं दिसून येत आहे. त्याला चालायलाही त्रास होत असल्याचं या व्हिडीओतून कळून येत आहे. या व्हिडीओच्या शेवटी काजोलानं स्वत: च्या बॉडीगार्डला धक्का दिल्याचे दिसत आहे. काजोलचं असं वागणं पाहून नेटकरी संतापले आहे आणि ते वेगवेगळ्या कमेंट देखील करताना दिसत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

काजोलचा व्हिडीओ पाहिल्यानंतर तिला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'काजोल दिवसें-दिवस जया बच्चनसारखी का होते?' दुसरा नेटकरी म्हणाला, 'काजोलला नक्की काय झालंय? स्वत: च्या बॉडीगार्डला धक्का दिला?' तिसरा नेटकरी म्हणाला, 'किती गर्विष्ठ आहे ती. स्वत:च्याच बॉडीगार्डला धक्का देते.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'तिला लोकांची किंमत नाही. जो तिच्या सुरक्षेसाठी काम करतोय, त्यालाच... हद्द झाली ही तर.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सिक्योरिटी गार्डसोबत इतकं चुकीचं वागते. गरज नसताना इतका गर्व आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'काजोल = जया बच्चन.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'काजोल ही दुसरी जया बच्चन झाली आहे.'


हेही वाचा : 'तो त्याची पॅन्ट काढून आमच्याकडे पाहायचा आणि...', अभिनेत्रीनं सांगितला शालेय जीवनातील भयानक अनुभव


काजोलला ट्रोल होताना पाहून तिच्या चाहत्यांनी तिची बाजू घेतली आहे आणि सांगितलं की तिला तिचा मुलगा आजारी असल्यानं चिंता वाटत असेल. त्यामुळेच तिनं असं केलं असेल. व्हिडीओमध्ये युग आजारी असल्याचं दिसून येतंय. दरम्यान, काजोल आणि अजय देवगणनं यांनी 13 सप्टेंबर रोजी त्यांचा मुलगा युगचा वाढदिवस साजरा केला.