मुंबई : काजोल, शाहरुख आणि अमिताभ बॉलिवूडचे फेमस स्टार आहेत. देश-विदेशात त्यांचे फॅन आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या फोटोवर अनेक लाईक्स मिळतात. पण कधी कधी ते त्यांना महागात पण पडतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालमध्ये सात दिवस कोलकाता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान अनेक बॉलिवूड आणि टॉलिवूडचे कलाकार उपस्थित होते. यामध्ये दिग्गज अमिताभ बच्चन आणि कमल हसन हे देखील होते. काजोलला यांच्या सोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही आणि तिने दोघांसोबत फोटो काढून तो ट्विटरवर शेअर केला, पण त्यानंतर ती ट्रोल झाली.


काजोलने जो फोटो पोस्ट केला होतो तो तिने स्वत: नव्हता काढला. म्हणजे तो सेल्फी नव्हता. पण तिने फोटो पोस्ट करतांना त्याला सेल्फी म्हटल्याने इतरांनी यावर चांगलीच खिल्ली उडवली. अमिताभ बच्चन, कमल हासन, शाहरुख खान यांसह अनेक सेलिब्रिटी पश्चिम बंगालमधील या कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह प्रसिद्ध कलाकारांनी केले. सात दिवस हा फेस्टिवल चालणार आहे.




पाहा व्हिडिओ