रात्रीच्या अंधारात केलेल्या `या` कृत्यामुळे काजोल देवगन ट्रोल
बॉलीवूड अभिनेत्री काजोलचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री काजोल (Kajol)चा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Kajol Video VIral) होत आहे. ज्यामुळे तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागत आहे. वास्तविक, या व्हिडिओमध्ये काजोल तिच्या मुलासोबत (Kajol With Son Yug) रात्रीचे जेवण करून रात्री उशिरा रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान काजोल सतत तिच्या मुलाचा हात धरताना दिसतेय. मात्र अशा परिस्थितीत इथे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते म्हणजे काजोलच्या सनग्लासेसने… जे तिने रात्रीच्या अंधारात परिधान केले होते.
इंडस्ट्रीतील अनेक स्टार्स रात्री काळा चष्मा घालताना दिसतात. नुकतीच काजोलही तिचा मुलगा युगसोबत रात्री उशिरा रेस्टॉरंटमधून डिनर करताना दिसली. तेव्हा तिने रात्रीच्या अंधारात काळ्या रंगाचे सनग्लासेस घातलेला होता. तिच्या या सनग्लासेसने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. काजोलला पाहताच पापाराझींनी तिला घेरलं आणि फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली. त्याचवेळी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्स आता अभिनेत्रीला ट्रोल करत आहेत.
काजोल ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली
व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून सोशल मीडिया युजर्सनी तिला रात्री सनग्लासेस लावण्याचं कारण विचारलं आहे. तर अजून एका युजर्सने तिला विचारलं की, रात्री काळा चष्मा घालतं का कोणी?... तर कुणी म्हटलंय- का धरतेयस मुलाचा हात, स्वत: स्वत:ला सांभाळता येत नाही का? या व्हिडिओवर वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत लोक काजोलला ट्रोल करताना दिसत आहेत. (Kajol was seen staggering outside the restaurant at night son Yug was seen handling the mother like this video)
मात्र, काजोलला कुटुंबासोबत असताना पापाराझींना कॅमेऱ्यासमोर पोज देणं आवडत नाही. ती या सर्व गोष्टींपासून दूर राहणं पसंत करते आणि आपल्या मुलांनाही मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर ठेवते.
काजोल सोशल मीडियावर सक्रिय असते
काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर, काजोल शेवटची तिचा पती अभिनेता अजय देवगणसोबत तानाजी चित्रपटात दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली. याशिवाय काजोल सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि दररोज तिच्या फोटो आणि व्हिडिओंद्वारे चाहत्यांची मने जिंकताना दिसते.