Nysa Devgan Video: बॉलिवूड स्टार अजय देवगण (Ajay Devgan) व काजोलची (Kajol) लेक न्यासा देवगण (Nysa Devgan) या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत असते. अद्याप न्यासाचा बॉलिवूड डेब्यू झालेला नाही. पण सेलिब्रिटी किड असल्यामुळे कॅमेरे सतत तिच्यावर असतात. 19 वर्षांची न्यासा सध्या विदेशात अनेकदा तिचे व्हिडीओ आणि फोटोज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरताना दिसतात. कधी पार्ट्यांमुळे, कधी बोल्ड ड्रेसमुळे, कधी लुकमुळे. सध्याचं प्रकरणही असंच आहे. न्यासा पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.


डिजिटल लायब्ररीचं उद्घाटन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अहमदनगरच्या ग्रामीण भागात एनवाय (NY Foundation) फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला न्यासा देवगणने (Nysa Devgan) हजेरी लावली होती. या कार्यक्रमातील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाले आहे.  येथील एका गावातील डिजिटल लायब्ररीचं उद्घाटन तिच्या हस्ते पार पडलं. पिवळ्या रंगाच्या ट्रॅडिशनल ड्रेसमध्ये न्यासा या इव्हेंटमध्ये पोहोचली. शाळेतील मुलांसोबत तिने संवाद साधला. त्यांच्यासोबत फोटो क्लिक केलेत. सोबत मुलांना पुस्तकं आणि स्पोर्ट किट्सचही वाटप केलं. या कार्यक्रमात न्यासाने छोटं भाषणही दिलं. आपल्या भाषणात तिने अभ्यास आणि वाचनाचं महत्त्व सांगितलं. पण भाषणाच्यावेळी न्यासाने तोडके-मोडके हिंदी भाषण करत मुलांना शिक्षणाबद्दलचे महत्व सांगितले. तिच्या हिंदीमुळे आता ती सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहे. 



वाचा: 'माझ्यावर सतत नजर ठेवली जातेय' म्हणत आलियाचा आक्रोश, असं काय घडलं?


न्यासा झाली ट्रोल 


न्यासाच्या या व्हिडीओवर विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘जेव्हा तुम्हाला अशा कार्यक्रमात बोलायला दिलं जातं, ज्याच्याबद्दल तुम्हाला काहीच माहीत नसतं’, असं एकाने लिहिलं. तर ‘लाजेखातर मला हसू अनावर होतंय’, असंही दुसऱ्या युजरने म्हटलंय.  तर एकाने अरे हिचं हिंदी ऐकून हिंदी भाषाही रडत असेल, असं एका युजरने लिहिलं. अरे देवा, हिला फक्त पार्ट्या करायला सांगा, अशी कमेंट एका युजरने केली. 



न्यासाचा बॉलिवूड डेब्यू कधी होणार?


 20 एप्रिल 2003 रोजी जन्मलेली काजोल व अजयची लेक न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिकतेय. न्यासाचा बॉलिवूड डेब्यू कधी होणार? हे जाणून घेण्यास चाहते उत्सुक आहेत. मात्र सध्या न्यासा शिकतेय. आत्ता ती तिचं लाईफ एन्जॉय करतेय. ती इतक्या लवकर इंडस्ट्रीत येईल, असं मला वाटत नाही, असं काजोल अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती.