मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने टॅलेंट स्ट्रीट काळा घोडा इथे सुरू करण्यात आली आहे. या टॅलेंट स्ट्रीट च्या माध्यमातून नवोदित कलाकारांना खुले व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. मे 2018 पर्यंत दर रविवारी विविध क्षेत्रातील कलाकारांना आपली कला या ठिकाणी सादर करता येणार आहे.


हे आमंत्रण आहे 'टॅलेंट स्टीट'चं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईच्या काळा घोडा इथं महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ आणि मुंबई महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमानं हा अनोखा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. जिथं कलाकारांना आपल्या विविध कला सादर करण्याची संधी मिळाली आहे. 


कलाकारांना इथं हक्काचं व्यासपीठ


इतकच नव्हे तर कुंभारकाम, व्यंगचित्रकार, शिल्पकृती, वारली कला, स्ट्रीट प्ले, नकलाकार अशा कलाकारांना इथं हक्काचं व्यासपीठ मिळालंय.. डोळ्यादेखत इथं एखादी कलाकृती तयार होते आणि तिची खरेदीही करता येते त्यामुळे कलाप्रेमींसाठी हे ठिकाण म्हणजे अलिबाबाची गुहाच ठरली आहे. मे 2018 पर्यंत दर रविवारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.


हा उपक्रम मुंबईकरांसाठी पर्वणीच ठरेल


या खुल्या व्यासपीठाचं कलाकारांनीही स्वागत केलंय.. हा उपक्रम मुंबईकरांसाठी पर्वणीच ठरेल असा विश्वास कलाकारांनी व्यक्त केला आहे.


'टॅलेंट स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल'ला जरूर भेट द्या


लोककला,पारंपरिक कला,शास्त्रीय कला यासह विविध कलाकृती सादर करणाऱ्यांसाठी हे खुल व्यासपीठ देण्याचा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. आता या कलाकारांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि नोवेदीत कलाकारांची कला पाहण्यासाठी आपण ही पुढील रविवारी या 'टॅलेंट स्ट्रीट आर्ट फेस्टिव्हल'ला जरूर भेट द्या.