Netizens Support Arshad Warsi Over His Kalki 2898 Ad Comment : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासचा 'कल्कि 2898 एडी' हा चित्रपट 27 जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमीश्र प्रतिसाद मिळाला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटानं चांगली कमाई करत अनेक रेकॉर्ड मोडले. आता प्रदर्शनाच्या जवळपास 2 महिन्यांच्या आत हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. नाग अश्विन दिग्दर्शित हा चित्रपट काल 22 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर हिंदीत आणि प्राइम व्हिडीओवर तमिळ, तेलगू, मल्याळ आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. खरंतर चित्रपट पाहिल्यानंतर बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीनं प्रभासच्या भूमिकेला जोकर म्हटलं होतं. त्यानंतर सगळीकडे त्याच्या वक्तव्याची चर्चा रंगली होती. आता जेव्हा चित्रपट ओटीटीवर आला त्यानंतर प्रेक्षकांनी अर्शद वारसीनं बरोबर बोल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्शद वारसीनं काही दिवसापूर्वी एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं कल्कि पाहिल्याचं सांगितलं आणि त्यासोबत हा खुलासा केला की त्याला तो चित्रपट आवडला नाही. त्यानं म्हटलं की प्रभासला जोकर बनवलं. अर्शदच्या या वक्तव्याची सगळीकडे चांगलीच चर्चा रंगली होती. त्यामुळे त्याला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. आता अर्शदच्या वक्तव्यानंतर सगळीकडे एकच चर्चा रंगली आहे. एका नेटकऱ्यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत प्रभास हा नक्कीच पॅन इंडिया स्टार आहे, पण बाहुबली सोडून, त्यानं असं काहीच केलं नाही, ज्याला अभिनयाचा मास्टर क्लास म्हणता येईल. 



दुसऱ्या नेटकऱ्यानं लिहिली की अर्शद वारसीनं जे काही सांगितलं ती चूकिचं नव्हतं. त्याला प्रभासची भूमिका आवडली नाही तर त्यावर बोलायला हवं. कल्किमध्ये प्रभास खरंच जोकरसारखा दिसतोय, चित्रपटात त्याचे सगळेच सीन हे खूप खराब आहेत. 


हेही वाचा : 'अभिषेक आणि माझ्यासाठी...'; ऐश्वर्याकडून नवऱ्याचं नाव पुढे करत शाहरुखसोबतच्या चित्रपटाला नकार


या चित्रपटात प्रभाससोबत दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हासन हे कलाकार महत्त्वाचे असतात. इतकी मोठी स्टार कास्ट असल्यानं सगळीकडे याच चित्रपटाची चर्चा सुरु होती.