Rajendra Prasad Daughter Death : 'कल्कि 2898 AD' मध्ये दिसलेला तेलगू अभिनेता राजेंद्र प्रसाद यांच्यावर दु:खाचं डोंगर कोसळलं आहे. त्याचं कारण म्हणजे त्याची लेक गायत्रीचं शनिवारी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी निधन झालं. गायत्रीनं वयाच्या 38 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गायत्रीच्या निधनाचं कारण हृदय विकाराचा झटका होतं. सोशल मीडियावर सेलिब्रिटी आणि कुटुंबातील सदस्यांपासून चाहते देखील त्यांची सांत्वन करत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मनी कंट्रोल' च्या रिपोर्टनुसार, गायत्रीच्या छातीत दुखायला लागलं, ज्यानंतर तिला शुक्रवारी हैदराबादच्या AIG रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. राजेंद्र प्रसाद तेव्हा शूटिंगमध्ये व्यस्त होते आणि त्यांना जशी गायत्रीला रुग्णालयात येण्यात आलं याविषयी कळलं त्यानंतर ते लगेच रुग्णालयात पोहोचले. उपचारा दरम्यान, गायत्रीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं आणि शनिवारी सकाळी 12:40 मिनिटांनी तिचं निधन झालं. गायत्रीच्या पार्थिवार अंत्यविधी हा आज शनिवारी हैदराबादमध्येच होणार आहे. राजेंद्र प्रसाद यांची लेक गायत्रीच्या निधनानं त्यांना मोठा धक्का बसला आहे. 


रिपोर्ट्सनुसार, गायत्रीनं वडील राजेंद्र प्रसाद यांच्या इच्छे विरोधात जाऊन लग्न केलं होतं. तर त्यामुळेच त्या दोघांमध्ये दुरावा आला होता. खरंतर, 2018 मध्ये त्यांच्यातील हा वाद संपवत ते एकत्र आले होते. राजेंद्र प्रसाद यांनी सांगितलं की 'लेक गायत्रीला पाहिलं की त्यांना त्यांच्या आईची आठवण यायची. राजेंद्र प्रसाद जेव्हा लहाण होते तेव्हाच त्यांच्या आईचं निधन झालं होतं. संकटाच्या या काळात पवन कल्याण यांनी राजेंद्र प्रसाद यांची हिंम्मत वाढवली. पवन कल्याण म्हणाले, 'श्री राजेंद्र प्रसाद तुमच्यासोबत मी आहे. त्यांच्या मुलीचं श्रीमती गायत्री देवीचं अचानक निधन झाल्यानं मला आश्चर्य झालं आहे. मी प्रार्थना करतो की तिच्या आत्म्याला शांती मिळो. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबासोबत मी आहे. मी आशा करतो की देव श्री राजेंद्र प्रवास यांना या दु:खातून बाहेर येण्याची शक्ती देईल.'


हेही वाचा : VIDEO : पापाराझींवर का चिडला करीनाचा मुलगा जेह! नेटकरी म्हणाले, 'कॅमेरामनचीच चूक...'



ज्यूनियर एनटीआरनं देखील राजेंद्र प्रसाद यांची लेकीच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे, त्यासोबत त्यांनी त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचं म्हटलं. त्यांनी लिहिलं की 'राजेंद्र प्रसाद यांची लेक गायत्री, जी माझी खूप जवळची होती. तिच्या निधनानं मला खूप दु:ख झालं आहे. मी प्रार्थना करतो की तिच्या आत्म्याला शांती मिळो. राजेंद्र प्रसाद आणि त्यांचे कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी होतोय.'