मुंबई : 'एक पल', 'रुदाली', 'चिंगारी', 'दमन' या स्त्रीप्रधान चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या दिग्दर्शिका कल्पना लाजमी या कॅन्सरशी झुंज देत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किडनीचा कॅन्सर झालेल्या कल्पना यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ६१ वर्षीय कल्पना यांच्यावर आठवड्यातून चार वेळा डायलिसिस करण्यात येतं. त्यांची एक किडनी काढण्यात आली असून त्यांच्या दुसऱ्या किडनीला संसर्ग झाला आहे.


त्यांच्यावर करण्यात येणाऱ्या उपचारांचा खर्चही बॉलिवूड सेलिब्रिटी उचलतात. कल्पना यांच्यावरील उपचारांसाठी दर महिन्याला जवळपास अडीच लाखांचा खर्च येत आहे. या खर्चाची जबाबदारी ‘इंडियन फिल्म्स अॅण्ड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन', आमिर खान आणि रोहित शेट्टी यांनी उचलली आहे.