मदुराई : तामिळनाडूच्या राजकारणात आणखी एका सिनेकलाकराचं आगमन झालं आहे. अभिनेता रजनीकांत यांच्यानंतर कमल हासन यांनी राजकरणात एन्ट्री केली आहे. बुधवारी त्यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या नव्या राजकीय पक्षाचे नाव 'मक्कल नीथी मय्यम' अर्थात लोक न्याय पार्टी असे जाहीर केले असून पक्षाचे चिन्ह आणि झेंड्याचेही अनावरण केलं.


मदुराईमध्ये पक्ष स्थापनेसाठी सभा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मदुराईमध्ये कमल हासन यांनी बुधवारी पक्ष स्थापनेसाठी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केली. या सभेदरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह काही राजकीय नेते आणि कमल हासन यांच्या चाहत्यांनी हजेरी लावली. 


पक्षाचं नाव 'मक्कल नीथी मय्यम'


पक्षाचे नाव घोषित करताना कमल हासन म्हणाले की, मक्कल नीथी मय्यम' पार्टी तुमची आहे. ही पार्टी लोकांसाठी आहे. मी फक्त तुमचा टूल आहे, तुमचा नेता नाही. 


राजकीय सल्ल्याची मागणी


मी तुमच्याकडून राजकीय सल्ल्याची मागणी करत आहे. तर दुसरीकडे, कमल हासन यांच्या पक्षाच्या घोषणेआधीच राज्यात राजकीय वातावरणात तापल्याचे दिसून आलं. डीएमकेचे वरीष्ठ नेते एमके स्टॅलिन यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं. राजकारणात कागदाच्या फुलांमधून कधीही सुगंध येत नाही, असे त्यांनी पत्रात लिहिले.