Kamal Haasan : लवकरच लोकसभा निवडणूक सुरु होणार आहे. त्याआधीच तमिळनाडूमध्ये युतीचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील सत्ताधारी असलेल्या डीएमके आणि राजकारणी, अभिनेता कमल हासन यांच्या मक्कल निधि मैय्यम यांचा पक्ष एकत्र येण्याचा प्रयत्न करत आहे. सुत्रांचे म्हणणे आहे की दोघांमध्ये आता जागा वाटपावर अखेर चर्चा सुरु आहे. लवकरच दोन्ही पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची घोषणा करू शकतात. खरंतर कमल हासन यांनी आधीच माहिती दिली होती की डीएमकेसोबत एकत्र येऊ शकतात. यात कॉंग्रेस देखील सहभागी होऊ शकते. एमके स्टालिन यांना भेटून लोकसभा निवडणूक एकत्र लढवणार असल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे ते विरोधी पक्षाच्या गटात शामिल होण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विधानसभेतील अर्थसंकल्प अधिवेशनानंतर दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता आहे. सोमवारपासून तमिळनाडूच्या विधानसभा अर्थसंकल्प अधिवेशन सुरु होऊ शकतं. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएनएमला जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. या जागेवर कमल हासन यांना स्वत: निवडणूक लढवायची आहे. एमएनएमचे निवडणूक चिन्ह बॅटरी टॉर्च आहे. निवडणूक आयोगाने त्यांना आठवडाभरापूर्वीच हे चिन्ह दिले आहे.


'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, डीएमकेनं आपल्या मित्रपक्षांशी पहिल्या टप्प्यातील चर्चेचे आयोजन केले आहे. युतीत नवा पक्ष आल्यास पुन्हा एकदा चर्चा सुरू होईल. यापूर्वी त्यांचा पक्ष सत्ताधारी द्रमुकसोबतच्या युतीत सामील झाल्याचीही बातमी समोर आली होती. 


हेही वाचा : Munawar Faruqui ची एक झलक पाहण्यासाठी मुंब्य्रात तुडूंब गर्दी! पोलिसांना करावा लागला लाठीचार्ज


दरम्यान, कमल हासनसोबत जर ही युती निश्चित झाली तर त्यांची सीट फायनल करण्यासाठी देखील इतर पक्षांसोबत चर्चा सुरु आहेत. सुत्रांनुसार, त्यांना कोईम्बतूर किंवा चेन्नई उत्तरमधून निवडणूक लढवायची आहे. मात्र, सध्या दोन्ही जागांवर द्रमुकचे खासदार आहेत. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत कमल हासन यांनी आपलं नशीब आजमावलं होतं. परंतु त्यांना कोईम्बतूर दक्षिण मतदारसंघातील भाजप उमेदवाराविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.


थलपती विजयचा पक्ष


तमिल सुपरस्टार विजयनं 2 फेब्रुवारी 2024 रोजी त्याचा राजकीय पक्ष तमिझगा वेत्री कळघम (TVK) लाँच केला. 2026 च्या विधानसभा निवडणुक हे त्याचे लक्ष्य असल्याचे विजय म्हणाला होता. दरम्यान, सुपरस्टार विजयच्या कार्यालयातून एक स्टेटमेंट जारी करण्यात आले होते. त्यात म्हटले होते की TVK 19 फेब्रुवारी 2024 (सोमवार) रोजी पनीयुर येथील पक्षाच्या मुख्यालयात सकाळी 9 वाजता आपल्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. या बैठकीत 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत निर्णय जाहीर करण्यात येणार आहेत.