मुंबई : अभिनेता ते राजकारणी झालेले कमल हसन (Kamal Hassan) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार आहे. कमल हसन यांच्या पायाच्या हाडात इन्फेक्शन झालं आहे. यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कमल हसन यांना श्री रामचंद्र मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाकडून जाहीर झालेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये सांगितलं आहे की, कमल हसन यांच्या पायाच्या हाडात थोड्या प्रमाणात संक्रमण झालं आहे. त्यामुळे त्यांच्या पायाची सर्जरी केली जाणार आहे. त्यांची तब्बेत आता स्थिर आहे. काळजीचे कोणतेही कारण नाही. 



कमल हसन यांच्या पायाला अनेक वर्षांपूर्वी दुखापत झालेली. पायात संक्रमण झाल्यामुळे सर्जरी करण्यात आलेली. कमल हसन यांना डॉक्टरांनी आराम करायला सांगितलं आहे.


कमल हसन यांची पार्टी आगामी तामिळनाडू विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. त्यांच्या पार्टीला बॅटरी हे निवडणूक चिन्ह मिळालं आहे. अशावेळी कमल हसन यांची तारेवरची कसरत सुरू आहे. असं असलं तरीही ते दोन्ही गोष्टी खूप छान सांभाळत आहे.