मुंबई : ऑस्टेलियन ऑलराउंडर अँड्र्यू सायंमंड्सचं कार अपघातात निधन झाल्याची दुदैवी घटना घडली.या घटनेने क्रिकेट वर्तुळात शोककळा पसरली. आज सकाळपासून सायमंडला क्रीडा, बॉलिवूड, उद्योग जगत अशा सर्वचं क्षेत्रातून श्रद्धांजली वाहिली गेली. नेहमीच वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असलेल्या कमाल खानने देखील ट्विट करून अँड्र्यू सायंमंड्सला श्रद्धांजली वाहिली. मात्र त्याच्या या ट्विटवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. सायमंडचे चाहते त्याच्या या ट्विटवर संतापले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूड अभिनेता कमाल आर खान अनेकदा ट्विटरवर वादग्रस्त विधान करून चर्चेत असतो. दररोज तो कोणत्या ना कोणत्या विषयावर तो आपले मत मांडत वाद ओढवून घेत असतो. नुकतेच केआरकेने त्याच्या ट्विटरवर असे काही ट्विट केले की प्रत्येकजण कमेंटमध्ये त्याची खिल्ली उडवू लागले आहे.  



 केआरकेने त्याच्या ट्विटरवर एक पोस्ट केली, ज्यामध्ये तो अँड्र्यू सायमंड्सच्या मृत्यूचा उल्लेख करताना दिसला. त्याने लिहिले, 'RIP क्रिकेटर #AndrewSymonds ज्यांचा जन्म 1975 मध्ये झाला आणि त्याचे निधन झाले. म्हणजे माझीही वेळ आता जवळ आलीय, असे म्हटले आहे. त्याच्या विधानावर चाहते खिल्ली उडवत तर काहींनी यावर संताप व्यक्त केला आहे.