मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री शिल्पा शेट्टी पती राज कुंद्रा पॉर्नोग्राफी प्रकरणी चर्चेत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात अनेक अभिनेत्रींनी  राज कुंद्रा विरोधात तक्रार नोंदिवली. त्यामधील एक अभिनेत्री म्हणजे 'कामसूत्र' फेम अभिनेत्री शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) . काही दिवसांपूर्वी शर्लिनने सोशल मीडियाच्या माध्यमातून शिल्पावर निशाणा साधला. 'दीदी येडा बनकर पेडा खा रही है...' असं म्हणत आता शर्लिनने शिल्पा आणि राजला पॉर्न विश्वातून बाहे र येण्याचा सल्ला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शर्लिनने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये शर्लिन म्हणते, 'जर रील लाइफमध्ये लोकांना सहानुभूती दाखवण्याऐवजी वास्तविक जीवनात पीडित महिला आणि मुलांसाठी शिल्पाने काही केले तर संपूर्ण जग तिला साष्टांग दंडवत करेल.' सध्या शर्लिनचं हे वक्यव्य तुफान व्हायरल होत आहे. 


राज आणि शिल्पाला दिला महत्त्वाचा सल्ला
'शिल्पाला पीडित महिला आणि मुलांसाठी काहीतरी करायचे आहे तर स्टेजवर जावून साष्टांग दंडवत घाल...  राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी बोलणे खूप सोपे आहे. तू प्रत्यक्ष जीवनात काहीतरी करा. आपल्या बंगल्यातून बाहेर ये आणि काहीतरी कर. तुम्ही दोघे पोर्नच्या जगातून बाहेर पडा आणि काहीतरी करा. मग बघा संपूर्ण जग तुमच्यापुढे नतमस्तक होईल....'


राज कुंद्रा आणि पोर्नोग्राफी 
पॉर्नोग्राफी प्रकरणामुळे राज कुंद्राला जुलैमध्ये तुरुंगात जावे लागले. आता जवळजवळ 62 दिवसांनंतर त्याला जामिनावर बाहेर येण्यास मार्ग मोकळा झाला. राजला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला.