गोलगप्पे खाताना काम्या पंजाबी सोबत घडली भयानक घटना; जाणून बसेल धक्का
आजकाल अनेक सेलेब्स पानीपुरी खाताना दिसत आहेत.
मुंबई : आजकाल अनेक सेलेब्स पानीपुरी खाताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी रुबिना दिलीक तिच्या कुटुंबासोबत पाणीपुरीचा आस्वाद घेताना दिसली होती. त्यानंतर 'लाल सिंग चड्ढा'च्या ट्रेलर रिलीज कार्यक्रमानंतर आमिर खानही देखील गोलगप्पा एन्जॉय करताना दिसला. आता काम्या पंजाबीचा असाच एक फोटो समोर आला आहे. यामध्ये ती गोलगप्पा खात होती पण लाखो रुपये तिथेच विसरली.
काम्या पंजाबी या दिवसांत इंदूरमध्ये होती. येथे ती एक लाख रुपयांचा लिफाफा पाणीपुरीच्या दुकानात विसरली. दिलेल्या एका मुलाखतीमध्ये ती म्हणाली, 'मी रविवारी एका कार्यक्रमासाठी इंदूरमध्ये होते. मी परत येत असताना माझ्या मॅनेजरने सांगितलं की मॅडम एक गोलगप्याचं दुकान आहे. जे चांगले गोलगप्पे बनवतं. इंदूर चाटसाठीही प्रसिद्ध आहे.
आणि मग काय मी स्वतःलाही थांबवू शकले नाही आणि तिथे जाण्याचा निर्णय घेतला. यावेळी माझ्यासोबत एक लिफाफाही होता. त्यात सुमारे एक लाख रुपयांची रोकड होती. मी ते टेबलच्या बाजूला ठेवले. आणि खायला सुरुवात केली. पण मी खाण्याच्या नादात आणि फोटो काढण्यात इतकी व्यस्त झाले की मी माझा लिफाफा तिथेच विसरले
पाणीपुरीच्या दुकानात लाखो रुपये विसरली
काम्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती हॉटेलमध्ये पोहोचली तेव्हा तिला समजलं की, तो तिच्याकडे तो लिफाफा नाही. तिने तो लिफाफा पाणीपुरीच्या दुकानात सोडल्याचं तिला आठवलं. ती पुढे म्हणाली, 'माझा मॅनेजर तिथे पोहोचला. मी इथे खूप अस्वस्थ होते. ते त्याला सापडेल अशी आशा होती. मी मनात विचार करत होते की, ते सापडलं तर माझ्या नशिबाचे आभार मानावे लागतील.
कारण ती जागा खूप गजबजलेली होती. बरं, जेव्हा माझा मॅनेजर तिथे पोहोचला तेव्हा त्याला ते पॅकेट सापडलं जिथे आम्ही ते सोडलं होतं. त्यानंतर त्यांनी पाणीपुरी स्टॉलचे मालक दिनेश गुर्जर यांच्याशी बोलून त्यांच्याकडून ते घेतलं. मी खूप घाबरले होते. इंदूरचे लोकं खरोखरच छान आहेत.