Pratyusha Banerjee Kamya Panjabi : छोट्या पडद्यावरील 'बालिका वधू' या मालिकेतून लोकप्रियता मिळवणारी दिवंगत अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीचं निधन होऊन 9 वर्ष झाली आहेत. कथितपणे प्रत्युषानं 2016 मध्ये आत्महत्या केली होती. प्रत्युषाच्या मैत्रिणीनं यासाठी प्रत्युषाचा एक्स बॉयफ्रेंड राहुल राज सिंगला जबाबदार ठरवलं होतं. आता 9 वर्षांनंतर राहुल राज सिंगनं धक्कादायक खुलासा केला आहे आणि काम्या पंजाबीवर गंभीर आरोप केले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल राज सिंहनं सुभोजीत घोषला त्याच्या यूट्युब चॅनलला दिलेल्या एका मुलाखतीत प्रत्युषाच्या कथित आत्महत्येविषयी सांगितलं. त्याशिवाय हे देखील सांगितलं की अभिनेत्रीच्या निधनासाठी त्याला का जबाबदार ठरवण्यात आलंय. राहुल राजनं दावा केला की काम्या पंजाबीनेच प्रत्युषाची हत्येविषयी चर्चा करायला सुरुवात केली. ज्यानंतर विकास गुप्ता आणि राखी सावंतनं पुढे सांगितलं. 



राहुल राजनं याविषयी पुढे सांगितलं की काम्या पंजाबी आणि विकास गुप्ता हे दोघे देखील त्याविषयी चर्चा करू लागले. त्यांनी सांगितलं की 'राहुलनं प्रत्युषाची हत्या केली. हेच मी त्यांच्या मीडियाला दिलेल्या मुलाखतीत पाहिलं आहे. त्यांनी दावा केला की प्रत्युषावर कोणतंही आर्थिक संकट नव्हतं आणि तिच्याकडे काम देखील होतं. विकास गुप्तानं कधीच प्रत्युषाला काम दिलं नाही, पण अशी वक्तव्य केली आहेत.'


राहुल राजनं पुढे काम्या पंजाबीविषयी बोलत सांगितलं, 'काम्यानं प्रत्युषाकडून 2.5 लाख रुपये उधार घेतले. मी काम्याला ओळखत सुद्धा नव्हतो. एकदा एका पार्टीत प्रत्युषानं माझी आणि तिची भेट घालून दिली होती. काम्या पूर्णपणे मद्यधुंद अवस्थेत होती.' 


राहुल राजनं पुढे सांगितलं की 'प्रत्युषानं काम्याला जवळवास 2-2.5 लाख रुपये दिले होते आणि तिनं काम्याला पैसे परत देण्यास सांगितलं होतं. काम्यानं सांगितलं की तिच्याकडे काही काम नाही आणि तिनं म्हटलं की ती नंतर परत देईल.' 


हेही वाचा : अभिनेत्यानं 25 दिवसात 16 किलो वजन केलं कमी; म्हणाला, 'मी मूर्ख होतो, असं डायट केलं ज्यानं एका कलाकाराचा...'


राहुल राजनं पुन्हा काम्या पंजाबीवर प्रत्युषाला मद्यपानाची सवय लावून देण्याचा आरोप देखील केला. राहुल म्हणाला, 'ते खूप मद्यपान करायचे. माझी नेहमी इच्छा होती की प्रत्युषानं मद्यरान करणं बंद करावं. तिचे मित्र खूप पार्टी करायचे. तिला हे माहितही होतं की तिच्या चांगल्यासाठी मी तिला मद्यपान करू नकोस असं सांगतो आणि त्यामुळेच तिनं अशा पार्टीमध्ये जाणं बंद केलं. त्यामुळ मी तिच्यासाठी व्हिलेन झालो. तर तिच्या मित्रांना वाटलं की मी त्यांना आणि प्रत्युषाला दूर करतोय. काम्या खूप पार्टी करायची, हे सगळ्यांनाच माहित आहे.'