Kangana Ranaut's Emergency: अभिनेत्री आणि खासदार कंगना राणौतचा आगामी चित्रपट 'इमर्जन्सी' 6 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण यावरून सतत वाद होत आहेत. अभिनेत्रीच्या या चित्रपटाबाबतचा गोंधळ थांबण्याची चिन्हे सध्या दिसत नाहीत. आता या चित्रपटावर अकाली दलानेही आक्षेप घेतला आहे. त्यांनी सेन्सॉर बोर्डाला चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची विनंती केली आहे. कंगना राणौतच्या 'इमर्जन्सी'वर बंदी घालण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे.


'इमर्जन्सी' चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याची शिरोमणी अकाली दलाची मागणी 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिरोमणी अकाली दलाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष परमजीत सिंग सरना यांनी बुधवारी सेन्सॉर बोर्डाला पत्र लिहिले आहे. त्या पत्रात म्हटले आहे की, काही दिवसातंच प्रदर्शित होणाऱ्या 'इमर्जन्सी' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चुकीची ऐतिहासिक तथ्ये दाखवण्यात आली आहेत. जी केवळ शीख समुदायाबद्दल  चुकीची माहितीच देत ​​नाहीत तर द्वेष निर्माण करून सामाजात अस्थिरतेचे वातावरण तयार करत आहे.


 



पक्ष काय म्हणतो


असे चित्रण केवळ दिशाभूल करणारे नाही तर पंजाब आणि संपूर्ण देशाच्या सामाजिक जडणघडणीच्या दृष्टीने अत्यंत अपमानास्पद आणि हानीकारक असल्याचे पक्षाचे म्हणणे आहे. सरना म्हणाले, "या चित्रपटामुळे जातीय तेढ वाढेल आणि चुकीची माहिती पसरेल, ही भीती लक्षात घेऊन, मी सीबीएफसीला या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी आपले अधिकार वापरून प्रयत्न करण्याची विनंती करतो आहे."


खासदार झाल्यानंतर कंगनाचा हा पहिलाच चित्रपट


हिमाचल प्रदेशातील मंडीतून खासदार म्हणून निवडून आल्यानंतर 'इमर्जन्सी' हा कंगना राणौतचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटावर शीख समुदायाने आक्षेप घेतला आहे. आता हे प्रकरण न्यायालयातही पोहोचले आहे. चित्रपटात शीखांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.


हेही वाचा: 'स्त्री 3'मध्ये जना होणार सुपर खलनायक? अभिषेक बॅनर्जी म्हणाला, मला...


 


नेमका का आहे हा वाद


१४ ऑगस्टला 'इमर्जन्सी' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. तेव्हापासून हा वाद सुरू आहे. यातील काही आक्षेपार्ह दृश्ये काढण्यात यावीत, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. मोहालीचे रहिवासी गुरिंदर सिंग आणि जगमोहन यांनी ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने आरोप केला आहे की या चित्रपटात खोटे आणि चुकीचे तथ्य मांडण्यात आले आहे. पंजाबची सामाजिक प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.


शिरोमणी गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने पाठवली नोटीस 


शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (SGPC) यांनी कंगना रनौत आणि चित्रपटाच्या निर्मात्यांना वेगळी नोटीसही पाठवली आहे. त्यामध्येही त्याच दाव्यांचा समावेश केला गेला आहे. नोटीसमध्ये चित्रपटात दाखवलेल्या चुकीच्या इतिहासाचे आणि तथ्यांचे वर्णन करण्यात आले आहे. निर्मात्यांनी लेखी माफी मागावी असे त्यांत म्हटले आहे. 'इमर्जन्सी'चा हा ट्रेलर सोशल मीडिया आणि इतरही प्लॅटफॉर्मवरून हटवावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.