मुंबई : बॉलिवूडची 'क्वीन' अभिनेत्री कंगना राणावतच्या अलिशान घराची सध्या चर्चा आहे. डोंगर-दऱ्यांमध्ये असलेल्या या घराची किंमत ऐकून तुम्हाला धक्का नक्कीच बसेल. कारण या बंगल्याची किंमत 30 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.


बांधकाम खर्चासह ३० कोटी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या बंगल्याचं बांधकाम ४ वर्ष चाललं, बंगल्यावर झालेला खर्च धरुन ही किंमत 30 कोटींवर पोहचली आहे.  'क्वीन' चित्रपटाला 2014 मध्ये मिळालेल्या यशानंतर, कंगनाने 10 कोटी रुपयांना मनालीत जमीन खरेदी केली होती, अशा बातम्या मीडियात झळकल्या होत्या.


प्रत्येक स्टेप आऊटला बाल्कनी


कंगनाच्या बंगल्याची कुठलीही खिडकी उघडली, तरी समोर डोंगरांचं रम्य दृश्य पाहायला मिळतं. प्रत्येक खोलीला स्टेप-आऊट बाल्कनी आहे. कंगनाचा बंगला अत्यंत देखणा असल्याचं काही जण सांगतात. या बंगल्यामध्ये तब्बल ८ बेडरुम्स आहेत. 


वरच्या मजल्यावर रुफटॉप ऑब्झर्व्हेटरी


हिवाळ्यात सूर्यप्रकाश खेळता राहावा, याची पुरेपूर काळजी आर्किटेक्ट्सनी घेतली आहे. तर वरच्या मजल्यावर रुफटॉप ऑब्झर्व्हेटरी आहे.  लिव्हिंग रुममध्ये फायरप्लेसची सोय करण्यात आली आहे. शबनम गुप्ता यांनी बंगल्याचं डिझाईन केलं आहे.


जिम आणि योग रुमचीही व्यवस्था


बंगल्याच्या डायनिंग रुमची एक भिंत काचेची बांधण्यात आली आहे. त्यामुळे जेवतानाही डोंगरांचा व्ह्यू पाहता येईल. त्याचप्रमाणे जिम आणि योग रुमचीही व्यवस्था करण्यात आली आहे. कंगनाने वेळोवेळी ४ वर्ष बंगल्याच्या कामाचे अपडेट्स घेण्यासाठी मनालीला भेट देत होती.