Kangana Ranaut and Urmila Matondkar : बॉलिवूड अभिनत्री कंगना रणौतला लोकसभा तिकिट मिळालं आहे. तर या सगळ्यात कंगनाचं 2020 मध्ये अभिनेत्री उर्मिला मातोंडकरविषयी केलेलं वादग्रस्त वक्तव्य चर्चेत आलं आहे. कंगणा रणौत उर्मिला मातोंडकरला सॉफ्ट पॉर्न स्टार म्हटलं होतं. त्या दोघांमध्ये यावरुन सोशल मीडियावर चांगलाच वाद सुरु होता. आता पुन्हा एकदा त्यावरुन चर्चा सुरु आहे. कंगनाला याविषयी विचारण्यात आलं तर तिनं काय म्हटलं हे जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगनाला याविषयी 'टाइम्स नाउ समिट' मध्ये विचारण्यात आलं. तेव्हा कंगना म्हणाली, "सॉफ्ट पॉर्न किंवा पॉर्न स्टार हे आक्षेपार्ह शब्द आहेत? नाही. हे आक्षेपार्ह शब्द नाहीत. हा एक असा शब्द आहे जो सामाजिकरित्या मान्य नाही. या शब्दाचा स्वीकार केलेला नाही."  



खरंतर कंगना रणौतला लोकसभा निवडणूकीचं तिकिट मिळाल्यानंतर तिचे आधीचे काही वक्तव्य पुन्हा चर्चेत आले आहेत. एकीकडे कॉंग्रेस नेता सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. तर या सगळ्यात कंगनाचा 2020 मध्ये एक मुलाखत व्हायरल होतेय. ज्यात उर्मिता मातोंडकरला कंगणा सॉफ्ट पॉर्न स्टार म्हणाली होती. त्यासोबत म्हणाली की "उर्मिला एका मुलाखतीत तिच्या स्ट्रगलची खिल्ली उडवत होती आणि म्हणत होती की तिकिट मिळवण्यासाठी भाजपची बाजू घेण्याचा प्रयत्न करते. कंगनानं म्हटलं की उर्मिरा सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. जर उर्मिलाला तिकिट मिळू शकतो तर तिला का नाही. तेव्हा म्हणजेच 2019 मध्ये उर्मिलाला नॉर्थ सीटमधून लोकसभा तिकिट मिळालं होतं." 


कंगना पुढे म्हणाली की 'आपल्या देशात पॉर्न स्टारला जितका सन्मान मिळतो, विचारा सनी लियोनीला इतका सन्मान जगात कुठे कोणालाच मिळू शकत नाही.' कंगनानं उर्मिलावर केलेल्या कमेंटवर विचारण्यात येताच कंगना म्हणाली 'मला त्यांच्यावर कमेंट करण्यास सांगितले होते. मला विचारण्यात आलं होतं की भाजप कोणत्या आधारावर माझा राजकारणात येण्याचा विचार करत आहे. हा उर्मिलाचा प्रश्न होता. माझं असं म्हणणं आहे की कलेचे वेगवेगळे क्षेत्र आहेत. माझा विश्वास आहे की कलेची विविध क्षेत्रे आहेत. सनसनाटी कला, ज्याला आपण मास आर्ट म्हणतो, जी आपल्याला केवळ उत्तेजित करते किंवा शारीरिकरित्या उत्तेजित करते, ही देखील एक कला आहे. बौद्धिकदृष्ट्या उत्तेजित करणाऱ्या, मनाला उत्तेजित करणाऱ्या कलेपेक्षा ती कधीही चांगली असू शकत नाही.'


हेही वाचा : अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील आले समोरासमोर; इतक्यात चिमुकला म्हणाला....


कंगनानं पुढे सांगितलं की "मी एक व्यक्ती म्हणून असं समजते की मी या बॅलेन्स चित्रपटसृष्टीच्या आर्टिस्टपैकी मी एक आहे. मी कधीच आयटम नंबर केला नाही, त्यामुळे मला इतकंच म्हणायचं आहे की जर ती (उर्मिला मातोंडकर) तिच्यासारखे चित्रपट करुन कोणत्या पक्षात (कॉंग्रेस) मध्ये जाऊ शकते, तर मी तर आणखी चांगलं काम केलं आहे."