...म्हणून कंगना राणौतने मुंबई महापालिकेकडे मागितले २ कोटी रूपये
कंगनाच्या याचिकेवर २२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच वादग्रस्त मुद्द्यांवर आपलं मत प्रकट करत असते. आपल्या परखड आणि बेधडक वक्तव्यांमुळे तिला अनेक संकटांचा सामना देखील करावा लागतो. काही दिवसांपूर्वी मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई करत कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवला. मुंबई महापालिकेनं तिच्या ऑफिसचं बांधकाम बेकायदेशीरपणे तोडल्याचा आरोप करत तिने महापालिकेकडून २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे
कंगनाने मुंबई महापालिकेला नोटीस पाठवत मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी महापालिकेकडून २ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यासंदर्भात कंगनाने रविवारी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवनावर भेट देखील घेतली. यावेळी कंगनाने बीएमसीने कार्यालयावर केलेल्या कारवाईबाबत चर्चा केली.
दरम्यान मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयावर कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकाम दाखवत पालिकेने त्यावर हातोडा चालवला. त्यानंतर आता कोर्टाने परिस्थिती जैसे थे ठेवण्याचे आदेश दिले असून कंगनाच्या याचिकेवर २२ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.