मुंबई : नेहमी वादाच्या भोवऱ्यात असणारी अभिनेत्री कंगना रानौत सोमवारी मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चाहत्यांमध्ये आनंदात दिसली. तिच्या हसण्यामागे कारण देखील खास होत. तिचा 'पंगा' चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ती चित्रपटाच्या प्रमोशन साठी एकापेक्षा एक शक्कल लढवताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'पंगा' या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती चक्क लोकल ट्रेनचं तिकिट देताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती घेत असलेला 'पंगा' चाहत्यांना पसंतीस पडतो की नाही हे पाहणं मजेशीर असणार आहे. 



एक पत्नी, आई, मुलगी आणि मैत्रीण म्हणून कंगनाने तिच्या वाट्याला आलेली भूमिका तितक्याच ताकदीने साकारल्याची झलक ट्रेलरमध्ये पाहता येता आहे. जेसी गिल या चित्रपटातून तिच्या पतीच्या तर, अभिनेत्री नीना गुप्ता या तिच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहेत. 


अश्विनी अय्यर तिवारीच्या दिग्दर्शनात साकारलेल्या 'पंगा' या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर अखेर प्रदर्शित करण्यात आला आहे. यामध्ये कंगनाने मध्यमवयीन विवाहितेची भूमिका साकारली आहे. जी नोकरी, घर, कुटुंब, मुलगा, पती अशा प्रत्येकांसाठी तिच्या आयुष्यातील जवळपास सर्वच क्षण खर्ची घालत असते. 


मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या अनेक कर्तृत्ववान महिल्यांना काही गैरसमजुतींमुळे त्यांच्या स्वप्नांना आवरतं घ्यावं लागतं. हाच समज मो़डीत काढणारा हा 'पंगा' २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.