मुंबई : शिवसेनेची सत्ता गेल्याने मुख्यमंत्री पदाचा त्याग करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर अभिनेत्री कंगना रानौतने प्रतिक्रिया दिली आहे. 'शिवसेनाचं हनुमान चालिसा बॅन करत असेल, तर त्यांना खुद्द "शिव" देखीव वाचवू शकत नाही...' असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर स्वतःचं मत इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट करत व्यक्त केलं आहे. सध्या कंगनाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय म्हणाली कंगना रानौत?
'1975 नंतर आताचा काळ हा भारताच्या लोकशाहीसाठी महत्त्वपूर्ण काळ आहे. 1975 मध्ये लोकनेते जेपी नारायण यांनी ‘सिंहासन खाली करा’ असं म्हंटल्यानंतर सिंहासन पडलं होतं. 2020 मध्ये मी म्हटलं होतं की, लोकशाही हा एक विश्वास आहे. सत्तेच्या अहंकारामुळे जो हा विश्वास तोडतो, त्याच्या अहंकाराचा अंत होणं निश्चित आहे. ही एखाद्या विशिष्ट व्यक्तीची शक्ती नाही, तर ती एका चारित्र्याची शक्ति आहे.'


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


कंगना पुढे म्हणाली, 'हनुमानजी यांना भगवान शंकराचा बारावा अवतार मानलं जातं. शिवसेनाचं हनुमान चालिसा बॅन करत असेल, तर त्यांना खुद्द "शिव" देखीव वाचवू शकत नाही. हर हर महादेव, जय हिंद जय, महाराष्ट्र...'


दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात आलं होतं. सत्तेत असलेल्या शिवसेनेत उभी फूट पडली आहे. त्यात नेमकी शिवसेना कुणाची यावरून आरोपप्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. मात्र अखेर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर या सर्व राजकीय नाट्याला पूर्णविराम मिळाला आहे.