Kangana Ranaut on Karan Johar Post : बॉलिवूड अभिनेता कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि करण जोहर (Karan Johar) या दोघांमध्ये सतत वाद सुरु असतात. प्रियांका चोप्रा बॉलिवूडमधून बाहेर जाण्यासाठी करण जोहर जबाबदार असल्याचे कंगनानं म्हटलं होतं. त्यानंतर करणचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओला पाहताच कंगनानं पुन्हा एकदा करणवर निशाणा साधला. दरम्यान, करणनं या व्हिडीओवरून त्याला ट्रोल करणाऱ्यांना नाव न घेता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सडेतोड उत्तर दिले होते. दरम्यान, त्यावरून देखील कंगनानं करणला ट्रोल केलं आहे. यावेळी कंगना म्हणाली माझ्यामुळे तुझी हिंदी सुधारी...अब आगे-आगे देखो होता है क्या


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खरंतर करणची स्टोरी पाहिल्यानंतर नेटकऱ्यांना अपेक्षा होती की थोड्यावेळात कंगणाची यावर प्रतिक्रिया येईल. कंगनानं करण जोहरच्या त्या इन्स्टाग्राम स्टोरीचा स्क्रिन शॉट शेअर केला आहे. हा स्क्रिन शॉट शेअर करत कंगनानं तिची प्रतिक्रियाही दिली. कंगना म्हणाली, एक वेळ होती जेव्हा चाचा चौधरी एलीट नेपोटीझम माफियाच्या लोकांसोबत नॅशनल टेलिव्हिजनवर माझा अपमान करायचा आणि बूली करायचा कारण मला इंग्रजी बोलता येत नव्हती. आज त्याची हिंदी पाहून मला वाटलं की आता तर फक्त तुझी हिंदी सुधारली आहे. पुढे अजून काय होतय ते पाहत रहा, (आगे-आगे देखो होता है क्या), असे कॅप्शन दिलं आहे. 



काय म्हणाला होता करण?


करणनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट शेअर करत करण म्हणाला होता की 'लगा लो इल्जाम.... हम झुकने वालों में से नहीं, झूठ का बन जाओ गुलाम, हम बोलने वालों में से नहीं, जितना नीचा दिखाओगे, जितना आरोप लगाओगे, हम गिरने वालों में से नहीं, हमारा कर्म हमारी विजय है, आप उठा लो तलवार, हम मरने वालों में से नहीं।'


हेही वाचा : 'हम झुकने वालों में से नहीं...', अनुष्का शर्माचं करिअर संपवण्याच्या वादावर Karan Johar नं दिला इशारा


अनुष्का शर्माविषयी काय म्हणाला होता करण जोहर 


करणनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की त्याला अनुष्काचा करिअर संपवायचं होतं, असं तो एका मुलाखतीत म्हणाला होता. आदित्य चोप्रानं अनुष्काला त्याच्या रब ने बनादी जोडी या चित्रपटासाठी कास्ट केलं होतं. तर त्याला अनुष्काच्या जागी सोनम कपूरला चित्रपटात कास्ट करायचे होते. पण आदित्यनं करणनं ऐकली नाही आणि त्यानं अनुष्काला कास्ट केलं होतं. त्यानंतर करणनं जेव्हा ‘बॅन्ड बाजा बारात’ पाहिला तेव्हा करणला त्याचं खूप वाईट वाटलं आणि त्यानं अनुष्काला त्याच्याच चित्रपटात कास्ट केलं.