Kangana Ranaut Reacts On Sadhguru Surgery : ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरू सद्गुरू यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव यांना गंभीर आणि जीवघेण्या आजाराने ग्रासले होते आणि त्यामुळेच त्यांच्या मेंदूची तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आता अनेकजण ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. आता बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतने सद्गुरू यांच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तिने याबद्दल एक ट्वीट केले आहे. 


कंगनाने ट्विटरवरुन दिली प्रतिक्रिया


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कंगना रणौतने तिच्या अधिकृत ट्विटरवरुन एक ट्वीट केले आहे. यात तिने अध्यात्मिक गुरू सद्गुरू यांच्या मेंदूवरी शस्त्रक्रियेबद्दल भाष्य केले आहे. "आज मी जेव्हा सद्गुरुजींना रुग्णालयातील आयसीयू बेडवर पाहिलं, तेव्हा मला जबरदस्त धक्का बसला. ते देखील आपल्याप्रमाणेच हाडं, रक्त आणि मांसाने बनलेले आहेत, याची मला जाणीव झाली. आता मला असं वाटतंय की देव कोसळतोय. पृथ्वी हलली आहे. आकाशाने त्याचा त्याग केला आहे, माझं डोकं गरगरत आहे, मला यावर विश्वास ठेवण्याची इच्छा नाही. पण मी पूर्णपणे तुटली आहे." असे कंगनाने म्हटले.


"आज लाखो लोक (भक्त) माझ्या वेदना समजू शकतात. मला माझ्या या वेदना तुम्हा सर्वांसोबत शेअर करायच्या आहेत, मी त्या थांबवू शकत नाही. ते लवकरात लवकर बरे व्हायला हवे, नाहीतर सूर्य उगवणार नाही, पृथ्वी हलणार नाही आणि हा क्षण निर्जीव आणि स्थिर होईल", असे कंगनाने तिच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे. कंगनाच्या या ट्वीटवर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. तसेच तिचे हे ट्वीट सध्या चर्चेत आहे. 



सद्गुरू यांना नेमकं काय झालं?


सद्गुरू जग्गी वासुदेव यांना गेल्या चार आठवड्यांपासून डोकेदुखीचा त्रास होत होता. वेदनांची तीव्रता भरपूर होती. मात्र त्यांनी त्यांचे कार्यक्रम सुरूच ठेवले. 8 मार्च 2024 रोजी रात्रभर महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन केले. मात्र, 15 मार्च 2024 रोजी दुपारी दिल्लीला पोहोचल्यावर त्यांची डोकेदुखी असह्य झाली. त्यानंतर त्यांना दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयात आणण्यात आले. जेथे ज्येष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनित सुरी यांच्या सल्ल्याने त्यांचे एमआरआय स्कॅन दुपारी साडेचार वाजता करण्यात आले. ज्यामध्ये त्याच्या मेंदूमध्ये सूज आणि रक्तस्त्राव आढळून आला.