मुंबई : ७२ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जेथे देशभरात सर्वत्र उत्साहाचं वातावरण होतं. तेथे उत्साहाला गालबोट लागणारी घटना दिल्लीत घडली आहे. दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक (Delhi Farmer Tracker Rally)  वळण मिळालं. शेतकरी आणि पोलिसांमध्ये संघर्ष होऊन या रॅलीला हिंसक वळण मिळालं. यावेळी लाल किल्ल्यावर निशान साहिब हा झेंडा फडकावला. यानंतर हा विषय देशभरात चर्चेचा विषय होता. यावेळी सरकारचं समर्थन करताना अभिनेत्री कंगना रानौतने देखील यावार नाराजी व्यक्त केली. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२६ जानेवारीला दिल्लीत प्रजासत्ताकदिनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेड दरम्यान मोठा हिंसाचार झाला. याप्रकरणावर कंगनाने एक व्हिडीओ शेअर करत शेतकऱ्यांवर टीका केली होती. स्वतःला शेतकरी म्हणवून घेणारे दहशतवादी आहेत, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना तुरुंगात टाका असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं होतं. कंगनाचा हा व्हिडीओ पाहिल्यावर नेटकऱ्यांनी तिला चांगलंच धारेवर धरलं आणि टीकास्त्र डागलं. यामध्येच आता सहा दिग्गज ब्रँण्डने तिच्यासोबतचं कॉन्ट्रॅक्ट रद्द केलं आहे.



कॉलमनिस्ट आनंद रंगनाथन यांनी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रली आणि निशान साहिब यांच्या झेंडा फडकावल्यावर भाष्य केलं आहे. अवैध झेंडे फडकावणं जेवढं सोप्प वाटतं तेवढं ते नाही. ही जागा काबीज करण्याप्रमाणे आहे. यामागे प्रबल मानसिकता जोडली गेलेली आहे. हे चांगले संकेत नाहीत. मी कधी विचार केला नव्हता की, मला असा दिवस पाहावा लागेल. त्यांनी या ट्विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारला आहे की, तुम्ही या गोष्टीने सहमत आहात का?


तुम्ही शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटल्यामुळे आता आम्ही तुम्हाला बँण्ड अॅम्बेसेडर( सदिच्छादूत) करु शकत नाही. पण, आता मी त्यांना सांगू इच्छित आहे की, जे आज झालल्या हिंसेला पाठिंबा देत आहेत, ते सुद्धा दहशतवादी आहेत, असं ट्विट कंगनाने केलं आहे.