मुंबई : कायम वादाचा मुकूट डोक्यावर मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत (kangana Ranaut) सुरु असलेल्या मुद्द्यांवर बोलत असते. विशेष म्हणजे बॉलिवूडवर देखील अभिनेत्री निशाणा साधताना दिसते. बॉलिवूडमध्ये असणारी गटबाजी आणि घराणेशाही कायम कंगनाला खटकते. त्यामुळे ती कायम बॉलिवूड आणि स्टारकिड्सबद्दल वक्तव्य करत असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता तर कंगनाने स्टारकिड्सना 'उकडलेलं अंड...' म्हटलं आहे. कंगना सध्या आगामी 'धाकड' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. एका मुलाखतीत कंगनाने बॉलिवूडच्या तुलनेत दाक्षिणात्य सिनेमांना प्रेक्षकांचा अधिक प्रतिसाद मिळतो. असं कंगना म्हणाली. 


एवढंच नाही तर दाक्षिणात्य सिनेमे प्रक्षेकांच्या दृष्टीने विचार करतात. पण बॉलिवूड स्टारकिड्सला प्राधन्य देत असल्यामुळे बॉलिवूड मागे राहिला असल्याचं तिने सांगितलं आहे..


स्टारकिड्सवर निशाणा साधत कंगना म्हणाली, 'स्टार किड्स परदेशात शिक्षण घेतात.. हॉलिवूड सिनेमे पाहातात त्यामुळे त्यांची भाषा आणि त्यांचं अभिनय प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचत नाही. म्हणून ते अपयशी ठरताात... '


कंगना एवढ्यावरचं थांबली नाही, तर ती स्टारकिड्सना 'उकडलेलं अंड...' देखील म्हटलं. 'स्टारकिड्स दिसायला देखील खास नसतात.. ते एखाद्या उकडलेल्या अंड्यांसारखे दिसतात. त्यामुळे ते प्रेक्षकांसोबत जिव्हाळ्याचं नातं तयार करु शकत नाही...' सध्या कंगनाचं स्टारकिड्सबद्दल वक्तव्य तुफान चर्चेत आहे. 


कंगनाच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, ती लवकरचं 'धाकड' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. कंगना सध्या सिनेमाचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. कंगनाचा 'धाकड' सिनेमा 20 मे राजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.