मुंबई : बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या शत्रूंची काही कमी नाही आहे. प्रत्येकाचा कोणी ना कोणी शत्रू आहेत. अशातच काही दिवसांपासून सुरु असलेल्या पद्मावती सिनेमाचा वाद यावर अनेकांचा प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.


कंगनाचा नकार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पद्मावतीच्या वादात अनेक जण उडी घेत आहेत. त्यातच आता दीपिकाची शत्रू मानली जाणारी कंगना राणावतनेही उडी घेतली आहे. कंगनाने दीपिकाचं समर्थनास नकार दिला आहे. कंगनाने पद्मावतीसाठी दीपिकाला सपोर्ट करणार नसल्याचं म्हटलं आहे.


इतर कलाकार करणार समर्थन


ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी लवकरच दिल्लीला येऊन दीपिकासाठी सरकारीकडून सुरक्षा मागणार आहे. त्यांच्यासोबत खासदार जया बच्चन यांच्यासह बॉलिवूडचे अनेक कलाकार असणार आहेत. या यादीत करिना कपूर, आलिया भट्ट, विद्या बालन, अनुष्का शर्मा, प्रियंका चोप्रा, परिणीती चोप्रा आणि सोनाक्षी सिन्हा सारख्या अनेक अभिनेत्री आहेत. या सर्वांनी दीपिकाला आपलं समर्थन दिलं आहे. 


याचिकेवर सही करण्यास नकार


कंगनाला जेव्हा पद्मावतींच्या समर्थनासाठी याचिकेवर सही करण्यास सांगण्यात आले तेव्हा तिने त्याला नकार दिला. कंगनाने का नकार दिला याबाबत काहीही कळालेलं नाही पण अशा चर्चा आहेत की जेव्हा कंगनाचा  हृतिकसोबत वाद झाला होता तेव्हा कोणीही तिच्या मदतीसाठी पुढे आलं नव्हतं.


दीपिकाला धमकी


पद्मावती सिनेमावरुन सध्या देशभरात वाद सुरु आहे. अनेक संघटनांचा आणि समाजाचा या सिनेमाला विरोध आहे. या सिनेमावरुन दीपिकाला जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली आहे. त्यामुळे तिच्या सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे.