कंगनाच्या आयुष्याबद्दल मोठा खुलासा; वयाच्या १६ व्या वर्षी घडलं असं काही
वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत
मुंबई : कंगना रानौत (Kangana Ranaut) आपल्या प्रत्येक पोस्टमुळे चर्चेत असते. कलाकारांमध्ये ट्विटरवर सतत सक्रीय राहणाऱ्या कलाकारांमध्ये कंगना आहे. कंगना अतिशय स्पष्टपणे आपलं म्हणणं मांडत असते. कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या आयुष्याबद्दलचा मोठा खुलासा केला आहे. कंगनाने आपल्या संघर्षांच्या दिवसांबद्दल सांगितलं आहे. त्या काळात कंगनाच्या वडिलांनी तिला अजिबातच मदत केली नाही. कंगना पुढे सांगते की,'वयाच्या १६ व्या वर्षी ती अंडरवर्ल्ड माफियांमध्ये अडकली होती. या सगळ्या कठीण प्रसंगातही तिने संघर्ष केला, इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.'
कंगनाने ट्विटमध्ये लिहिलं आहे की,'वयाच्या १५ व्या वर्षी कंगनाने घर सोडलं. संघर्षाच्या काळात माझ्या वडिलांनी माझा साथ सोडला. मी स्वतःवर अवलंबून होते. १६ व्या वर्षी अंडरवर्ल्डच्या अटकेत अडकली होती. २१ व्या वर्षीच कंगनाने आपल्या आयुष्यातील शत्रूंना दूर केलं आणि नॅशनल अवॉर्ड जिंकून एक यशस्वी अभिनेत्री असल्याचं सिद्ध केलं. मुंबईच्या अतिशय उच्चभ्रू परिसरात कंगनाचं स्वतःचं घर आहे.'
शुटिंगमध्ये व्यस्त आहे कंगना
कंगना सध्या आपल्या सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. मध्य प्रदेशमध्ये कंगनाच्या आगामी सिनेमाचं शुटिंग सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून स्पाय थ्रिलर सिनेमाच्या शुटिंगमध्ये कंगना व्यस्त आहे. रविवारी ती वेळ काढून सातपुडा टायगर रिझर्व परिसरात फिरायला गेली होती. कंगनाने ही जंगल सफारी खूप एन्जॉय केली होती.
काही दिवसांपूर्वी कंगना रानौत ट्रोल झाली होती. हॉलिवूड अभिनेत्री मेरिल स्ट्रीप आणि गेल गडॉट सोबत आपली तुलना करत कंगनाने आपण ब्रम्हांडातील सुंदर अभिनेत्री असल्याचं म्हटलं आहे. तसेच ऍक्शनमध्ये कंगनाने स्वतःला टॉम क्रूझपेक्षा चांगल असल्याचं म्हटलं आहे.