मुंबई : आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रानौत (Kangana Ranaut) नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावर शीख समुदायाविरोधात (Sikh Community) आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कंगना रानौतविरोधात देशातल्या विविध ठिकाणी एफआयर दाखल करण्यात आला. कालच मुंबईतल्या खास पोलीस ठाण्यातही एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण कंगनाला याचा फारसा फरक पडलेला दिसत नाही. तीने याची खिल्ली उडवली आहे. कंगनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर आपला एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिच्या हातात वाईनचा ग्लास आहे आणि त्या फोटो खाली लिहिलंय 'आणखी एक दिवस... आणखी एक FIR... जर ते मला अटक करायला आले... माझा मूड सध्या घरात असा आहे...



कंगनाची वादग्रस्त पोस्ट
सरकारने कृषीविषयक कायदे मागे घेतल्यानंतर अभिनेत्री कंगनाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात तीने म्हटलं होतं, खलिस्तानी दहशतवादी आज शस्त्रास्त्रांच्या बळावर सरकारला प्रभावित करत असतील, पण हे विसरता कामा नये, एका महिला पंतप्रधानाने या खलिस्तानींना चिरडलं होतं. 


तसंच इंदिरा गांधी यांचा एक फोटो शेअर करत कंगनाने लिहिलं होतं, इंदिरा गांधी यांनी आपल्या जीवची पर्वा न करता त्यांना डासांसारखं चिरडलं, पण देशाचे तुकडे होऊ दिले नाहीत. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूच्या अनेक दशकानंतरही आजही ते त्यांच्या नावाने थरथर कापतात, त्यांना असाच गुरु पाहिजे, असं कंगनाने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.


सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतल्यानंतर याआधीही इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करताना कंगनाने लिहिलं होतं  'दुःखद, लज्जास्पद आणि पूर्णपणे चुकीचे... जर सरकार संसदेत बसण्याऐवजी रस्त्यावर बसलेले लोक कायदे बनवू लागले, तर हाही एक जिहादी देश आहे... सर्वांसाठी. ज्यांना हे हवे आहे त्यांचे अभिनंदन.